Railway Recruitment : रेल्वेतील ५,६९६ जागांसाठी वयाची अट शिथिल ; सहायक लोको पायलट भरतीसाठी १९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत

भारतीय रेल्वे २१ विभागांत सहायक लोको पायलट पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबवित आहे.
Railway Recruitment
Railway Recruitmentsakal

सोलापूर : भारतीय रेल्वे २१ विभागांत सहायक लोको पायलट पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबवित आहे. त्यासाठी वयाची अट तीन वर्षाने शिथिल केली आहे. त्यामुळे वयोमर्यादा उलटलेल्या उमेदवारांनाही यात सहभागी होता येणार आहे.

भारतीय रेल्वे सहाय्यक लोको पायलटच्या पाच हजार ६९२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवित आहे. कोरोना काळात दोन वर्षे गेल्याने तेव्हा परीक्षा घेता आल्या नाहीत. परिणामी अनेक उमेदवारांची वयाची मर्यादा उलटून गेल्याने त्यांना भरती आणि नोकरीपासून वंचित रहावे लागले. याचा विचार करुन रेल्वेने सहायक लोको पायलट पदासाठीच्या वयोमर्यादेत तीन वर्षांची सवलत दिली आहे. सहाय्यक लोको पायलट नियुक्तीसाठीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी टप्पेनहाय परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर केले आहे.

प्रवर्गनिहाय वयाची सवलत

सर्वसाधारण ३० ऐवजी ३३, ओबीसी ३३ ऐवजी ३६, एससी, एसटीचे ३५ ऐवजी ३८ वयाचे उमेदवार अर्ज करू शकतील. त्यासाठी सर्वसाधारण व इडब्ल्यूएसच्या उमेदवारांची जन्म तारीख २ जुलै १९९१ ते १ जुलै २००६, ओबीसींचे २ जुलै १९८८ ते १ जुलै २००६, एससी, एसटी उमेदवारांचे २ जुलै १९८६ ते १ जुलै २००६ दरम्यान असायला हवे.

या संकेतस्थळावरुन करा अर्ज

यासाठी किमान दहावीपर्यंतचे शिक्षण अथवा आयटीआय शिक्षण आवश्यक आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतील. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०० तर राखीव प्रवर्गासाठी २५० रुपये शुल्क आहे.

निगेटिव्ह मार्किंग

रेल्वे बोर्डाकडून सुरुवातीला संगणक आधारित चाचणी (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट १) ७५ गुणांची राहील. त्यासाठी ६० मिनिटांत ७५ प्रश्न सोडवावे लागतील. सीबीटी दोन झाल्यानंतर चाळणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर सामान्य ज्ञान, गणित, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी आदींवर चाचणी होईल. यासाठी निगेटिव्ह मार्किंग असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com