esakal | कोरोनाच्या खाईत महागाईचा बडगा 

बोलून बातमी शोधा

mahagai.jpg

त्यातच सध्या गोडे तेलाचे दरही वरचेवर वाढत असल्याने गृहिणींनाही ठसका बसत नाही आहे, तर दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा निर्बंध कडक झाल्याने नागरिक धास्तावला आहे. 

कोरोनाच्या खाईत महागाईचा बडगा 

sakal_logo
By
राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) ः  सध्या पेट्रोल-डिझेलच्या दराने शतक पार केले आहे. घरगुती गॅसमध्येही भरमसाठ मोठी दरवाढ झाली आहे. शेतीच्या मशागतीच्या जरा बरोबरच रासायनिक खताच्या दरातही भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक महागाईचा सामना करीत आहेत. शेतकऱ्यांना शासन हमी भाव देण्यास तयार नाही. त्यातच सध्या गोडे तेलाचे दरही वरचेवर वाढत असल्याने गृहिणींनाही ठसका बसत नाही आहे, तर दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा निर्बंध कडक झाल्याने नागरिक धास्तावला आहे. 
चार राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा माहोल रंगला असतानाच इंधन दरवाढ मात्र थांबली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने भाज्या किंवा चपात्या बिगर तेलाच्या करायच्या का? असा सवाल सर्वसामान्य गृहिणीतून विचारला जाऊ लागला आहे. महिनाभरात 50 ते 70 रुपयांनी खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलाबरोबरच डाळी, कडधान्याचे दरही कडाडले आहेत. खाद्य तेलाच्या किंमती दिवाळीपासून रोज वाढत आहेत. 15 किलो तेल डब्यासाठी 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. एकूणच वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक गणित मात्र फारच कोलमडून पडले आहे. 

तेलाचे दर 
महिना सूर्यफूल तेल सोयाबीन तेल शेंगतेल 
ऑक्‍टोबर 20 1,660 1,500 2,350 
नोव्हेंबर 20 1,800 1,720 2,400 
डिसेंबर 20 1,860 1,760 2,450 
जानेवारी 21 2,100 1,960 2,650 
फेब्रुवारी 21 2,000 1,860 2,650 
मार्च 21 2300 2100 2650 

डाळीचे सध्याचे दर 
तूर डाळ 110-115 
मूग डाळ 100 -110 
मसूर डाळ 70-80 
चणाडाळ 65-75 


गॅस दरवाढ 
नोव्हेंबर 20 599 
डिसेंबर 20 649 
जानेवारी 21 699 
फेब्रुवारी 21 750 
फेब्रुवारी 21 774 
फेब्रुवारी 21 799 
मार्च 21 825 

महिन्याचे बजेट कोलमडले

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या भांडणात खाद्यतेलाचे दर केव्हा वाढले हे समजलेच नाही. दाळीबरोबरच गॅसचे दर वाढल्याने महिन्याचे बजेट मात्र कोलमडले आहे. जुळवाजुळव करताना मोठी कसरत करावी लागत आहे. 
- उर्मिला माने, गृहिणी, केत्तूर 

वाहतुकीचे दर वाढले

डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतुकीचे दर वाढले आहेत. पर्यायाने जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढले आहेत. 
- सुहास निसळ, व्यापारी 

गरजेपुरती खऱेदी

वाढत्या महागाईचा महिन्याचे बजेट मात्र कोलमडले झाला असून महिन्याच्या वस्तू घेणारे ग्राहक कमी झाले आहेत. ज्या वस्तू लागतील त्याप्रमाणेच आता ग्राहक खरेदी करीत आहेत. 
- दिलीप खेडकर, व्यापारी