गुगल लेन्स, फोटोवरून माहिती मिळवण्याचा तिसरा डोळा!

Information can be retrieved from the Google Lens application.jpg
Information can be retrieved from the Google Lens application.jpg
Updated on

आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. अवघ्या काही क्षणात जगभरातील कोणतीही माहिती आज आपल्या हातातील मोबाईलवर उपलब्ध होते. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर गुगलवरती सर्च करतो आणि संबंधित गोष्टीची माहिती मिळवतो, पण एखाद्या गोष्टीला काय म्हणतात, हेच मुळात माहित नसेल तर त्यासंबंधीची माहिती कशी शोधायची? यासाठी एक उत्तर आहे ते म्हणजे 'गुगल लेन्स'.

एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल तर त्या गोष्टीचा फोटो काढून तो गुगल लेन्स या ॲप्लिकेशनवरती टाकला किंवा गुगल ॲप्लिकेशनमधील कॅमेरा ओपन करून फोटो घेतला तर तुम्ही त्यासंबंधीची इंटरनेटवर सध्या उपलब्ध असलेली इत्यंभूत माहिती मिळवू शकता. जशी की त्या गोष्टीचे नाव, ती कुठे मिळेल, त्याचे उपयोग आदी माहितीची खाणच आपल्यासमोर खुली होते. आहे की नाही गंमत? याच गुगल लेन्सचा उपयोग शिक्षणातील अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्या करता येऊ शकतो.
     
शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना येणाऱ्या अडचणींना सोडवण्यासाठी हे ॲप्लिकेशन उपयोगी पडेल. विविध संकल्पना समजून घेण्यासाठी त्याबद्दल आपलं मत बनण्यासाठी या ॲप्लिकेशनची मदतच होईल. चला तर मग फोटो काढूया आणि गुगल लेन्सच्या मदतीनं माहिती मिळवूया! 

- राजकिरण चव्हाण 
राज्य तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा समन्वयक, सर फाऊंडेशन सोलापूर


संपादन - सुस्मिता वडतिले 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police ASI
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
The programme was organised by Priyadarshini Mahila Vikas Mandal to support pilgrims during the Ashadhi Wari.
Thousands of devotees are expected to participate in the religious celebrations, with special arrangements for devotees including community fasting meals.
Marathi News Esakal
www.esakal.com