
सोलापूरः शहरातील खासगी रुग्णालयात सुरु असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये टसली झुम्यांब या औषधाचा खासगी रुग्णालयांना तुटवडा जाणवत असला तरी त्यासोबत आता ईटोली झुम्यांब या इंजेक्शनचा उपयोग पर्याय म्हणून केला जात आहे. एक ते चार डोसमध्ये ही इंजेक्शन रुग्णास दिले जाऊ लागले आहे. त्यासोबत फ़्लॅव्ही पिरॅव्हीर व स्टिरॉईडचा वापर प्रभावीपणे होऊ लागला आहे.
त्यासोबत आता सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारामध्ये फ्लॅव्ही पिरॅव्हीर हे औषध प्रभावीपणे वापरले जात आहे. हे औषध विषाणुची संख्या काही मर्यादेपर्यत कमी करण्यास मदत करते. मात्र त्याच्या परिणामांची देखील मर्यादा आहे. सध्या टसली झुम्यांब या औषधाचा तुटवडाच आहे. त्याला पर्याय म्हणून इटोली झुम्यांब हे इंजेक्शन वापरले जात आहे. या इंजेक्शनचे चार डोस रुग्णाला दिले जातात. एका इंजेक्शनची किमंत आठ ते साडे आठ हजार आहे. त्यामुळे टसली झुम्यांबच्या किमंतीपर्यंत चार डोसची किमंत जाते.
मागील काही दिवसात कोरोना उपचारामध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटर उपाययोजना ही अगदी अत्यावश्यक बाब होती. मात्र आता कोरोनाच्या आजारात श्वसनाची प्रक्रियेमध्ये रक्त गोठण्याची गुंतागुत होते असे स्पष्ट होऊ लागले आहे. या गुंतागूतीमध्ये रक्त पातळ करणाऱ्या औषधीचा उपयोग देखील प्रभावी ठरू लागला आहे.
लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या शरिरातील ऑक्सिजन सॅच्युरेशनच्या आधारे निदान होऊ लागले आहे. ही तपासणी व रॅपिड अँटिजेन टेस्टमूळे निदान लवकर होण्यामुळे उपचाराला अधिक वेळ मिळू लागला आहे. काही त्रास किंवा लक्षणे नसलेले रुग्ण आता लवकर उपचार मिळवू लागले आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या गंभीर स्थितीत येऊन होणाऱ्या मृत्युच्या घटना कमी होऊ लागल्या आहेत. या उपचारामध्ये स्टिरॉईडचा उपयोग देखील उपचारासाठी सुयोग्य ठरतो आहे. हाय फ्लो ऑक्सिजनमुळे थेट फुफ्फुसापर्यंत ऑक्सिजन वेगाने पोचवता येऊ लागला आहे. पुर्वीच्या यंत्रणेपेक्षा हाय फ्लो ऑक्सिजन अधिक उपचारात उपयुक्त ठरु लागला आहे.
वेगवान निदानाचा मार्ग मोकळा
अनेक प्रकारच्या ताज्या संशोधनानुसार कोरोना रुग्णांसाठी उपचारात नविन औषधी उपलब्ध करून तिचा वापर केला जात आहे. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या माहितीचा उपयोग केला जात आहे. ऍटिजेन टेस्ट व ऑक्सिमीटर चा लाभ रुग्णांना लवकर उपचार मिळवून देण्यासाठी होतो आहे.
-डॉ.सुदीप सारडा, अध्यक्ष हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन सोलापूर.
हायफ्लो ऑक्सिजन अधिक प्रभावी
कोरोना उपचारामध्ये हायफ्लो ऑक्सिजन वापराचे परिणाम अधिक चांगले मिळत आहेत. रुग्णांच्या फुफ्फुसापर्यंत वेगाने पुरवला ऑक्सिजन उपचारात खुपच प्रभावी ठरतो आहे. ही यंत्रणा उपचाराची गती वाढवण्यास सहायक ठरते आहे-
- डॉ. निर्मलकुमार तापडीया, वैद्यकीय अधिकारी आश्विनी रुग्णालय. सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.