Mohol News : मोहोळ शहरानजीक झालेल्या अपघातातील जखमी महिलेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली

एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिवाजी महापुरे यांच्या मृत्यूनंतर गंभीर जखमी झाल्या होत्या.
kalpana mahapure

kalpana mahapure

sakal

Updated on: 

मोहोळ - मोहोळ शहरानजीक चंद्रमौळी औद्योगिक वसाहती जवळ एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिवाजी महापुरे यांच्या मृत्यूनंतर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी कल्पना शिवाजी महापुरे (वय-52) यांची मृत्यूशी सूरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.कल्पना यांचाही मंगळवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे आता या अपघातातील मृत्युची संख्या दोन झाली.

Loading content, please wait...