चुकीच्या पद्धतीने अदा केलेल्या भूसंपादन रक्कमेची चौकशी करा : आमदार सचिन कल्याणशेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार सचिन कल्याणशेट्टी

चुकीच्या पद्धतीने अदा केलेल्या भूसंपादन रक्कमेची चौकशी करा : कल्याणशेट्टी

अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा कार्यक्षेत्रात सध्या सुरू असलेल्या सोलापूर ते कलबुर्गी रस्त्यावर आजपर्यंत ज्या शेतकरी बांधवांचे भूसंपादन झालेले आहे त्यातील एकाच गटातील असलेल्या सर्व खातेदारांना समान न्यायाने रक्कम्मा न वाटता आर्थिक देवघेव करून मर्जीतील शेतकऱ्यांनाच रक्कम देऊन अन्य लाभधारकांवर झालेला अन्याय ही गंभीर बाब असून याची त्वरित चौकशी करून त्यांनाही रक्कमा तातडीनेबअदा कराव्यात अशी जोरदार मागणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत केली.

याबाबत आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना कल्याणशेट्टी म्हणाले की यापूर्वी झालेल्या भूसंपादन अन्वये एकाच गटात एकापेक्षा अधिक नावे असताना आपल्या निकटवर्तीय माणसांकरवी चेकने रक्कम स्वीकारून त्या उताऱ्यावरील इतर लोकांची हरकत व लेखी तक्रारी असतानाही फक्त आर्थिक देवघेव करून ठराविक लोकांना पैसे अदा केली गेली आहे.याबाबत यापूर्वी तक्रार केल्यानंतर व पुरावे दिल्यानंतर संबधीत अधिकारीस निलंबित करण्यात आले होते. पण आता पुन्हा कामावर घेण्यात आले आहे.सदर बाब अतिशय गंभीर असतानाही चूक दुरुस्त करून योग्य त्या सर्व व्यक्तींना मोबदला हा मिळालाच पाहिजे आणि ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून न्याय द्यावा .तसेच यासाठी योग्य ती कारवाई करावी व चौकशी समिती नेमावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी योग्य ती कारवाई करून संबधीत शेतकरी बांधवांवर झालेला अन्याय जिल्हाधिकारी यांना स्वतः लक्ष घालण्यास सांगून दूर करण्यात येईल असे सदनास आश्वाशीत केले.या संदर्भात कल्याणशेट्टी यांनी लक्षवेधी उपस्थित केल्याने ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या सर्वांना उशिरा का होईना न्याय मिळण्याच्या मार्ग मोकळा होणार आहे.

विजेचे बिल जास्त भरूनही नेहमी शेतकरी बांधवांवर अन्याय होतो

यासंदर्भात बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले की अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील शेतकरी वीज बिल वसुलीस मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले असूनही त्यांच्या अडचणी मात्र कमी होत नाहीत.जसे रोहित्र संख्या वाढविणे,विजेचे साहित्य पुरविणे तसेच जोडणी तोडताना दुजाभाव करणे असे प्रकार सतत होत असतात.त्यासाठी मंत्रीमहोदयांनी लक्ष देऊन वीज बिल वसुलीच्या मनाने सेवेत असलेल्या त्रुटी दूर कराव्यात आणि शेतकरी बांधवाना दिलासा द्यावा अशी मागणी केली.याला उत्तर देताना मंत्री म्हणाले की आपल्या तालुक्यातील होणाऱ्या विजेच्या अन्याय संदर्भातील माहिती पत्राद्वारे द्यावी मी व्यक्तिशः लक्ष घालून प्रश्न मार्गी लावीन

Web Title: Inquire Land Acquisition Amount Sachin Kalyanshetti

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top