esakal | सोलापुरात येणाऱ्या 2574 जणांची तपासणी 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

प्रत्येक तालुक्‍यात आले पाचशे ते सातशे मुंबईकर अन्‌ पुणेकर 
कोरोनाच्या भीतीमुळे पुणे व मुंबईसह इतर जिल्ह्यातून अनेक लोक सोलापूर जिल्ह्यात आले आहेत. या लोकांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात सरासरी पाचशे ते सातशे लोक अन्य जिल्ह्यातून आले आहेत. सोलापूर शहरात नऊ हजार लोक व मुंबई येथून आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. अन्य जिल्ह्यातून सोलापुरात आलेल्या नागरिकांची संख्या प्रत्यक्षात या पेक्षाही अधिक असल्याचे समोर येऊ लागले आहे. 

सोलापुरात येणाऱ्या 2574 जणांची तपासणी 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी करण्यासाठी चार तपासणी नाके तर पुणे व सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची व प्रवाशांची तपासणी करण्यासाठी तीन नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सात नाक्‍यांवर 2 हजार 101 वाहनांमधील 2 हजार 574 प्रवाशांची तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
हेही वाचा - "सकाळ'च्या बातमीनंतर पंढरपुरातील भिकाऱ्यांना मिळाले अन्नपाणी 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशिय सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, पोलिस उप आयुक्त वैशाली कडूकर आदी उपस्थित होते. या रुग्णांचे आरोग्य, त्यांचे शारीरिक तापमान, ट्रॅव्हल हिस्टरीची तपासणी या नाक्‍यावर केली जात आहे. परराज्यातून येणाऱ्या वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात दुधनी व वागदरी (ता. अक्कलकोट), नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) व मरवडे (ता. मंगळवेढा) या ठिकाणी तपासणी नाके सुरू आहेत. 
हेही वाचा - शहरातून आलेल्यांना सर्दी, तापाच्या लक्षणांनी अफवा 
या चार नाक्‍यांवर 627 वाहनांमधील 2 हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. सातारा व पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी करण्यासाठी भीमानगर, नातेपुते व सराटी-अकलूज या ठिकाणी तीन तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. या तीन नाक्‍यांवर 1 हजार 474 वाहनांची आणि 547 प्रवाशांची तपासणी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

loading image