Solapur : सोलापूरच्या रे-नगरात कार्यक्रम स्थळाची पाहणी ; पंधरा हजार घरकुलांचे वितरण

स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था; पंधरा हजार घरकुलांचे वितरण
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रे-नगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १९) नियोजित आहे. त्या अनुषंगाने येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली. कार्यक्रमापूर्वी व कार्यक्रमानंतर परिसरात स्वच्छता राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, रे-नगर गृह प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार किरण जमदाडे, रे-नगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, ठेकेदार अंकुर पंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी उत्कर्ष होलकांसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घरकुल वितरण कार्यक्रम होत असलेल्या जागेची पाहणी केली. या ठिकाणी व्यासपीठ व व्यासपीठामागे आवश्यक कॅम्प ऑफिस, ग्रीन रूमची माहिती घेतली.तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एन्ट्री पॉईंट व एक्झिट पॉईंटची माहिती तसेच येथे लाभार्थी आल्यानंतर त्यांच्यासाठी शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदीबाबत माहिती जाणून घेतली. पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी सभास्थळी उपस्थित राहण्यासाठी करण्यात येत असलेल्या हेलिपॅडच्या कामाची पाहणी तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेलिपॅड ची जागा योग्य आहे का याचीही त्यांनी माहिती घेतली.

पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील सभा स्थळाची पाहणी तसेच नागरिक येण्या जाण्याचे मार्ग, पार्किंग व्यवस्थाबाबत माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

प्रारंभी प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी सभास्थळी करण्यात येत असलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली तर ठेकेदार अंकुर पंदे यांनी पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिली.

कार्यक्रमस्थळी ४०० शौचालय

रे-नगर फेडरेशनच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान एक लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता कळवली असल्याने त्या दृष्टीने सभा ठिकाणच्या परिसरात पंढरपूर येथून ४०० शौचालये आणून ठेवली जाणार आहेत. तसेच कार्यक्रमाच्या वेळी व कार्यक्रम संपल्यानंतरही या परिसरात स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे येथील स्वच्छतेबाबत नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहतील तर त्यांच्या अधिनस्त सफाई कर्मचारी ही येथे नियुक्त करण्यात येतील असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com