दौंड, कलबुर्गी रेल्वे स्थानकावरील सुरक्षेबाबत ओढले ताशेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian railway

दौंड, कलबुर्गी रेल्वे स्थानकावरील सुरक्षेबाबत ओढले ताशेरे

सोलापूर - रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा आणि सुरक्षेची तपासणी करण्यासाठी रेल्वे सुविधा समितीचे तीन सदस्य सोलापूर दौऱ्यावर आले होते समितीने स्थानकावर व इतर भागांमध्ये साफसफाईच्या कामावर समाधान व्यक्त केले. दौंड व कलबुर्गी रेल्वे स्थानकावरील सुरक्षेबाबत पोलीस आणि सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्याच्या सूचना देत ताशेरे ओढले. रेल्वेच्या केंद्रीय समितीकडून रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

कोरोना महामारीचे प्रादुर्भाव ओसरल्याने येत्या काही दिवसांत सर्व निर्बंध शिथिल होतील. येत्या २९ जूनपासून खिडीवरी जनरल तिकीटासह इतर सर्व सुविधा सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेस्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पॅसेंजर ॲमेनिटी कमिटी (पीएसी) ने सदस्यांशी 'सकाळ' ने केलेल्या संवादात माहिती दिली.

रेल्वे बोर्डाने नेमलेल्या शिवराज गंदगे, जयकुमार नागवाणी, ई. राधाकृष्णन, असलेल्या त्रिसदस्यीय समितीने सोलापूर विभागातील आठ स्थानकांवरील सोयीसुविधांबाबात तसेच वाडी स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरील परकीयांनी फ्लोरिंग काम त्वरित करण्याच्या सूचना समितीकडून देण्यात आल्या त्याचबरोबर समितीने पिण्याच्या पाण्याचे निरीक्षण करून पाहिले. विविध संघटनांच्या शिष्टमंडळांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान अनेक प्रश्न मांडल्यानंतर कमिटीने रेल्वे अधिकाऱ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या.

पॅसेंजर ॲमेनिटी कमिटीमध्ये (पीएसी) समाविष्ट असलेल्या समितीने केलेल्या पाहणी दौऱ्यामध्ये वाडी, कलबुर्गी, गानगापूर रोड, पंढरपूर, उस्मानाबाद, दौंड, अहमदनगर, साईनगर शिर्डी स्थानकाची पाहणी केली. त्याचबरोबर विभागीय रेल्वे कार्यालय येथे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बरोबर झालेल्या बैठकीत देखील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म, वाहनतळ, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आसनव्यवस्था, डिस्प्ले बोर्ड तसेच सुरू असलेल्या विविध कामाची पाहणी कमिटीच्या शिष्टमंडळाने केली. तसेच स्थानकावर असलेले स्टॉल, विक्रेते, चहा विक्रेते, आदींची कमिटीच्या वतीने माहिती घेतली. दौंड रेल्वे स्थानकावरील फूड प्लाझास अकरा हजार रुपयांचा दंड करण्यात आला. रेल्वे बोर्डाच्या समितीबरोबर अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येकी अकरा हजार रुपयांचे बक्षीस

रेल्वे बोर्डाच्या त्रिसदस्यीय समितीने सोलापूर विभागातील कलबुर्गी आणि अहमदनगर स्टेशनवरील स्वच्छता पाहून प्रत्येकी अकरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यामध्ये स्वच्छता, खानपान, पिण्याचे पाणी आदी सर्व सुविधा प्रवाशांना व्यवस्थितरीत्या दिल्या जात असल्याचे समितीतील सदस्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी बक्षीस दिले. सोलापूर विभागातील 75 टक्के काम चांगले असून, 25 टक्के कामे करण्याच्या सूचना देखील कमिटीच्या सदस्यांनी यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.

रेल्वे प्रशासनाला सुनावले खडे बोल

सोलापूर रेल्वे विभागाच्या दौऱ्यानिमित्त अनेक संघटनाच्या प्रतिनिधीनी शिष्टमंडळाची भेट घेतली. रेल्वेस्थानकावरील समस्यांचा पाढा वाचल्यानंतर समितीचे सदस्य गदंगे यांनी रेल्वेस्थानक प्रशासन, पोलिस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत रेल्वेस्थानकावरून समस्या दूर करण्याबाबत सूचना केल्या. रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंगची समस्या, किरकोळ चोर्‍या, विक्रेत्यांचे अतिक्रमण आदी समस्या त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी रेल्वे प्रशासनाला दिल्या.

Web Title: Inspection Of Various Stations By Central Committee Of Railways

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top