Success Story : पदवीनंतर थेट पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी

मंत्री चंडकच्या ऋषिकेश मुठेची नेत्रदीपक कामगिरी; कौतुकाचा वर्षाव
पदवीनंतर थेट पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी
पदवीनंतर थेट पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणीSakal

सोलापूर: घरात शासकीय नोकरीत असलेल्या भावंडापासून प्रेरणा घेत मंत्री चंडकच्या ऋषिकेश बाळू मुठे याने बीकॉम पदवी मिळाल्यानंतर थेट दोनच वर्षात सलग दुसऱ्यांदा एमपीएससी क्रॅक करत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

वडील मुंबईत असल्याने ऋषिकेशने बारावीनंतर मुंबईत बीकॉमची पदवी मिळवली. त्यांचे मोठे भाऊ हे ग्रामसेवक व बहीण या पोलिस खात्यात आहेत. त्यांनी ऋषिकेशला स्पर्धा परीक्षेची प्रेरणा देत योग्य दिशा दिली. कोरोना काळ ऋषिकेशसाठी सुवर्ण ठरला.

कारण अत्यंत शांत वातावरणात खूप अभ्यासाची तयारी ऋषिकेशने पूर्ण केली. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात त्याने एमपीएससी क्रॅक केली. मात्र नंतर जखमी झाल्याने त्याने हा प्रयत्न सोडून दिला. मात्र एकदा स्पर्धा परीक्षेत उतरले की सर्व पदांच्या परीक्षा देण्याची तयारी त्याने केली.

प्रिलीमनरी व मेन्स या दोन्ही परीक्षांसाठी त्याने सलग १२ तास अभ्यास व रात्री पुन्हा काही तास अभ्यास करण्याचा शिरस्ता ठेवला. या परिश्रमामुळे ऋषिकेशने एकाचवेळी सात पदाच्या विविध परीक्षा दिल्या होत्या. त्यापैकी विक्रीकर निरीक्षक पदासाठीचे यश केवळ ६ गुणांनी हुकले. याशिवाय इतर सहा पदाच्या परीक्षांमध्ये तो यशस्वी झाला.

यामध्ये एसटीआय, एक्साईज, टेक्निकल असिस्टंट, क्लर्क, टॅक्स असिस्टंट या पदाच्या परीक्षांचा समावेश होता. पण विक्री कर निरीक्षक किंवा पोलिस उपनिरीक्षक या दोन पदासाठी प्रयत्न करायचे असे ठरवून कोरोनानंतर त्याने दुसऱ्यांदा एमपीएससीची परीक्षा दिली. पण निकाल लांबणीवर पडला.

तेवढ्या कालावधीत त्याने पोलिस भरतीमध्ये देखील कोल्हापुरात अग्रमानांकन मिळवले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर हाती आलेल्या निकालात ऋषिकेशची निवड पोलिस उपनिरीक्षक पदासाठी झाली आहे.

ऋषिकेशच्या यशाचे गमक

  • पदवीपासून एमपीएससीची तयारी

  • रोज सकाळी ८ ते रात्री ८ अभ्यास

  • हिराचंद नेमचंद वाचनालयात रोज वाचन व अभ्यास

  • रात्री छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात अभ्यास

  • सलग दोन वेळा एमपीएससी केली क्रॅक

एवढ्यावर न थांबता आता वर्ग एक पदासाठी प्रयत्न करणार आहे. एकदा ठरवल्यानंतर यश मिळेपर्यंत थांबायचे नाही हे ठरवून कामाला लागलो. भाऊ व बहिणीने दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करत हे यश मिळवले.

— ऋषिकेश मुठे, मंत्री चंडक नगर, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com