

Inter-caste Marriage
esakal
किल्लेमच्छिंद्रगड : आजच्या काळात उच्च शिक्षणामुळे मुले-मुली त्यांच्यातील कलागुण पाहून जातीच्या भिंती तोडून आंतरजातीय विवाह करत आहेत. ज्या गावात पूर्वी जातीच्या आधारे लग्ने होत असत, तिथेही ही गोष्ट घडू लागली आहे. आंतरजातीय विवाहामुळे समाजातील स्पृश्य आणि अस्पृश्य ही भावना कमी होत असून लोक एकमेकांना समानतेने पाहू लागले आहेत.