
Solapur University: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30 व 31 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये विद्यापीठात दोन दिवसीय तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषद होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रारंभी श्रमिक पत्रकार संघ येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी कुलगुरू प्रा. महानवर यांचा यावेळी सत्कार केला.