पंढरपूरच्या रॉबिनहूड आर्मीच्या कामाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव 

Internationally acclaimed of the work of the Robinhood Army of Pandharpur
Internationally acclaimed of the work of the Robinhood Army of Pandharpur
Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील निराधार, बेवारस आणि गोरगरीब गरजू लोकांना जेवण पोचवण्याचे काम येथील रॉबिनहूड आर्मीचे कार्यकर्ते करत आहेत. पंढरपूरच्या या कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण आणि निःस्वार्थ कामाची दखल रॉबिन हूड आर्मीच्या जागतिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी घेतली असून पंढरपूर शाखेला आंतरराष्ट्रीय स्तरावर 13वा क्रमांक देऊन गौरविण्यात आले आहे. 
पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे कायमच भाविकांची गर्दी असते. या भाविकांच्याकडे भीक मागून जगणाऱ्या अनाथ लोकांची संख्या पंढरपुरात मोठी आहे. अनेक वृद्ध, अपंग, निराधार लोक पंढरपुरात बारमाही आश्रयाला असतात. त्यांच्यापैकी कोणी चंद्रभागेच्या वाळवंटात, कोणी बसस्थानकावर, कोणी रेल्वेस्थानक परिसरात तर कोणी शहराच्या वेगवेगळ्या भागांत जिथे आसरा मिळेल तिथे राहतात. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 17 मार्चपासून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. तेव्हापासून पंढरपूरला भाविक येणे बंद झाल्यामुळे शहरातील शेकडो निराधार लोक अडचणीत आले आहेत. अशा वेळी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने या लोकांना मोठा आधार दिला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी या लोकांना रोज जेवण देण्याचा निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही सुरू केली. पंढरपुरातील अनेक दानशूर लोकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या कामाला मोलाचा हातभार लावला आहे. 
श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने शहराच्या विविध भागातील अशा निराधार, अपंग लोकांना जेवण पोच करण्याचा निर्णय घेतला परंतु शेकडो लोकांचे जेवण शहरात ठिकठिकाणी जाऊन त्यांना वाटप करण्याची महत्त्वाची जबाबदारी कोणावर सोपवायची हा प्रश्‍न होता. रॉबिनहूड आर्मीच्या कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. 
रॉबिनहूड आर्मीच्या जगभरात अनेक देशात शाखा आहेत. जून 2018 पासून पंढरपुरातील विविध जाती-धर्माचे तरुण आपला व्यवसाय सांभाळून रॉबिनहूड आर्मीचे काम करत आहेत. शहरातील मठ, धर्मशाळा आणि खासगी लोकांच्या घरांत शिल्लक राहिलेले अन्न घेऊन ते भुकेल्या लोकांपर्यंत पोचविण्याचे काम हे कार्यकर्ते करत आहेत. लॉकडाउनच्या काळात हे कार्यकर्ते पंढरपुरातील शेकडो निराधार, अपंग, अनाथ व्यक्तींना जेवण पोचविण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत. या कामाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर पंढरपूर शाखेला 13वा क्रमांक देऊन गौरविण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com