Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Free Marriage Bureau Helps Thousands of Families: अक्कलकोट तालुक्यातील इरण्णा पनशेट्टी यांनी गेल्या १२ वर्षांत मोफत वधू-वर सूचक सेवेतून वीरशैव लिंगायत समाजातील ३ हजारांहून अधिक विवाह जुळवून समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
Solapur

Solapur

esakal

Updated on

राजशेखर चौधरी

अक्कलकोट: वीरशैव लिंगायत समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींना योग्य जोडीदार मिळावा या उदात्त हेतूने गेल्या बारा वर्षांपासून निस्वार्थपणे कार्यरत असलेले तडवळ, ता. अक्कलकोट येथील 67 वर्षे वयाच्या इरण्णा कल्लपा पनशेट्टी हे समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘पनशेट्टी चालता-बोलता वीरशैव लिंगायत मोफत वधू-वर सूचक केंद्राच्या' माध्यमातून त्यांनी हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com