Solapur : मंगळवेढ्यात संत चोखोबाच्या स्मारकाचा प्रश्न तीन मुख्यमंत्र्याकडूनही उपेक्षित

स्मारक समाधी परिसरात व्हावे जेणेकरुन भविक पर्यटकास समाधी स्थळ व अन्य माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
sant chokhoba 684th Memorial celebrations
sant chokhoba 684th Memorial celebrationssakal

मंगळवेढा : हयातीत उपेक्षित राहिलेल्या संत चोखोबाच्या स्मारकाचा प्रश्न तीन मुख्यमंत्र्याकडूनही उपेक्षित राहिला. स्मारकासाठी प्रस्ताव सादर करण्यात असून मंगळवेढ्यातील उपेक्षित संत चोखोबाच्या प्रलंबित स्मारकाला मंजुरी सह निधी उपलब्ध करावा अशी मागणी होत आहे.

प्रलंबित स्मारकांच्या मागणीसाठी स्व. आ. भारत भालके व आ. समाधान आवताडे यांनी अधिवेशानात प्रश्‍न उपस्थित केले.तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी 24 ऑगष्ट 2018 रोजी शिखर समितीच्या बैठकीत स्मारकाच्या कामाची जागा निश्‍चीत करुन आराखडा करण्याचे आदेश दिले.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयात नव्याने समाविष्ठ करावयाच्या कामासाठीच्या बैठकीत वारकरी संप्रादयाच्या प्रचार प्रसिध्दीच्या अनुसंघाने प्रास्तावित केलेल्या कामात चोखोबा स्मारकाचा आराखडा तयार करण्यात आला.

स्मारक समाधी परिसरात व्हावे जेणेकरुन भविक पर्यटकास समाधी स्थळ व अन्य माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.

शहरातील शासकीय कार्यालये बाहेर गेल्यामुळे शहरातील व्यवसायावर मोठा परिणाम झाला म्हणून, काही पोलीस वसाहतीजवळील जागा सुचविली.

व्यापाय्राची उपजिविका कायम ठेवत पोलीस स्टेशन व गणेश मंडळाची जागा पुर्ववत ठेवत स्मारक करण्याबाबत जिल्हाधिकाय्रांनी 20 जानेवारी 22 रोजी स्थळ पाहणी केली प्रास्तावित तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत समाधीस्थळ,

sant chokhoba 684th Memorial celebrations
Solapur : महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? दहा पदाधिकाऱ्यांच्या निवडी, जातीय समिकरणाची जुळवाजुळव

पुर्नविकास व सुशोभिकरण करणे,समाधीस्थळ परिसरातील यासाठी सि. सर्व्हे नं. 2292, 2293, 2294, 2295, 2282, 2283, 2278, 2276, 2285 ते 2291 या मिळकतीमधील 3172 चौ. मी. जागा उपलब्ध करण्यात आली त्यापैकी मंदीर व अंतर्गत रस्ता यासाठी 1217 चौ.मी जागा आवश्यक असल्याने 1955 चौ. मी. जागा स्मारकासाठी उपलब्ध होणार आहे.

त्यामध्ये जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, व नगरपालिकेच्या जागेचा समावेश आहे प्रास्तावित स्मारकामध्ये पुर्नविकास व सुशोभिकरणात स्मारक उभारणी, सभामंडप, बहुउददेशीय सभागृह,

sant chokhoba 684th Memorial celebrations
Solapur News : पंढरपुरात भालकेंचा प्रवेश, सोलापूर शहरात चाचपणी; भाजप-काँग्रेसच्या १४ माजी नगरसेवकांशी संपर्क

अभ्यासकेद्र,भोजनकक्ष, भक्त निवास रस्ते वाहनतळ शाळा बांधणे रस्ते सुशोभिकरण इ. कामाचा यात समावेश आहे परंतु चोकोबा स्मारकास मंजुरी देण्यासाठी शासनाला अद्याप मुहूर्त सापडला नसल्यामुळे चोकोबाच्या भाविकातून संताप व्यक्त केला जात आहे

कसे असणार प्रास्तावित कामे आणि रक्कम कोटीत

सभामंडप व बहुउददेशीय सभागृह 1.57,अभ्यासकेंद्र व भोजन कक्ष 1.37,भक्त निवास व व्यापारी संकुल 2.85, शाळा बांधणे 1.57, स्मारकाकडे जाणारे मार्ग 10.00, वाहनतळ 1.00, सुशोभिकरण 0.50 व जीएसटी 2.26 अशी 21.12 कोटीची रक्कम प्रास्तावित केली असून तीन वर्षातील भाडेवाढसहीत ते अंदाजपत्रक 24.92 कोटी करण्यात आले.

sant chokhoba 684th Memorial celebrations
Solapur News : जोडणी नसताना नळ आकारणीची पाठविली बिले; महापालिकेकडे २५० तक्रारी दाखल

हयातीमध्ये उपेक्षित राहिलेल्या संत चोकोबाच्या स्मारकाला आणखी किती वर्षे उपेक्षित ठेवणार यासाठी शासनाने संत चोखोबा स्मारकाला उपेक्षित न ठेवता जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर साहेबांनी सर्व सहमतीने तयार केलेल्या जिल्हास्तरावरील मान्य केलेल्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी व निधी उपलब्ध करून द्यावा.

- अविनाश शिंदे, सचिव संत चोखोबा समाधी मंगळवेढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com