जय महाराष्ट्रचा नारा अन्‌ जड अंतकरणाने पंढरीतून श्रमिकांना निरोप

Jai Maharashtra slogan and farewell to the workers with a emotional heart
Jai Maharashtra slogan and farewell to the workers with a emotional heart
Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : लॉकडाउनमुळे सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात अडकून पडलेले उत्तर प्रदेशातील कामगार आणि विद्यार्थी आज श्रमिक रेल्वेने लखनऊकडे रवाना झाले. यावेळी कामगारांच्या श्रमिक रेल्वेला प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, रेल्वेचे वरिष्ठ इंजिनिअर आर. एस. गव्हाणे यांनी हिरवा झेंडा दाखवून परप्रांतीय कामगारांना निरोप दिला. गाडी सुरु होताच गाडीतील अनेक तरुणांनी जय महाराष्ट्रचा नारा देत हात उंचाऊन उपस्थितांचे आभार मानले. यावेळी अधिकाऱ्यांचे मन भरुन आले होते. 

सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात अनेक परप्रांतीय मजूर कामाचे निमित्ताने आले होते. लॉकडाउनमुळे ते दोन महिन्यांपासून येथे अडकून पडले होते. यापूर्वी तामिळनाडू राज्यातील अनेक मजूरांना रेल्वेने पाठवण्यात आले होत. त्यानंतर आज दुसरी रेल्वे गाडी लखनऊकडे मजूरांना घेवून रवाना झाली. 
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा, मंगळवेढा या भागात उत्तर प्रदेशातील सुमारे एक हजार 361 मजूर अडकून पडले होते. या मजूरांनी गावी जाण्याची प्रशासनाकडे रितसर मागणी केली होती. त्यानुसार या सर्व मजूरांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली. 
त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारने या मजूरांसाठी पंढरपूर येथून श्रमिक विशेष रेल्वे गाडीची मोफत सोय केली होती. त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजता येथील रेल्वे स्टेशनवरुन 24 डब्यांची रेल्वेगाडी लखनऊ कडे रवाना झाली. येथील समाजिक कार्यकर्ते सुनिल पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने रेल्वेतील सर्व प्रवाशांना प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत मोफत पाणी बॉटलचे वाटप केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com