जल जीवन मिशन अंतर्गत 28 गावांना नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 26 कोटी - आ. आवताडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Samadhan Avtade

जल जीवन मिशन अंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील 28 गावासाठी नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 26 निधी मंजूर.

जल जीवन मिशन अंतर्गत 28 गावांना नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 26 कोटी - आ. आवताडे

मंगळवेढा - राज्यातील सत्ता बदलानंतर तालुक्यातील रखडलेल्या कामाला निधी मिळवण्याचा सपाटा आ. समाधान आवताडे यांनी लावला असून, त्यात जल जीवन मिशन अंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील 28 गावासाठी नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 26 निधी मंजूर झाल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सोलापूर यांच्याकडे याकामासाठी पाठपुरावा करून सदर योजनेसाठी भरीव निधीची तरतूद आपल्या मतदारसंघांसाठी पदरात पाडून घेतली. पोटनिवडणूकीतून आमदारपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर राज्यातील सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी परस्परविरोधी असल्याचा परिणाम विकासकामावर झाला मात्र तीन महिन्यात झालेल्या राजकीय सत्ताबदलानंतर आ. आवताडे यांनी मतदारसंघातील मूलभूत आणि पायाभूत विकासाकडे विशेष लक्ष देऊन मतदारसंघातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी आदी प्रश्‍नांना हात घालताना जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सदर निधी मंजूर झाल्याने या योजनेत समाविष्ट असलेल्या विविध गावांना आता पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याम्ाुळे भविष्यात पंढरपूर तालुक्यातील 6 तर मंगळवेढा तालुक्यातील 22 गावांतील लोकांना पिण्याच्या पाण्याची स्ाुविधा उपलब्ध होणार आहे आणखी त्यामध्ये प्रादेशीक पाणी पुरवठा योजना ही गावठाणाकरिता राबविण्यात आली मात्र या नव्या कामाच्या मंजूरीमुळे गावातील लोकांना विशेषता वाडीवस्तीवरील लोकांची होणारी भटकंती थांबणार आहे.

पंढरपूर तालुक्यातील गावे व मंजूर निधी पुढीलप्रमाणे

शेटफळ (त) 1 कोटी 5 लाख, सिद्धेवाडी (चिचुंबे) 2 कोटी 99 लाख, बोहाळी 85 लाख, शिरगांव - 1 कोटी 6 लाख, कासेगाव 1 कोटी 99 लाख, तनाळी 33 लाख.

मंगळवेढा तालुक्यातील समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे -

कात्राळ - 99 लाख, आसबेवाडी - 55 लाख, मुढवी - 56 लाख, सलगर खु - 71 लाख, कचरेवाडी - 67 लाख, रेवेवाडी - 89 लाख, शिरनांदगी - 69 लाख, जंगलगी 28 लाख, खुपसंगी 85 लाख, लोणार 1 कोटी 57 लाख, महमदाबाद (हु) - 97 लाख, चिक्कलगी 1 कोटी 37 लाख, ढवळस 90 लाख, नंदेश्‍वर 1 कोटी 99 लाख, पडोळकरवाडी 92 लाख, जुनोनी 37 लाख, महमदाबाद (शे) 90 लाख, मारोळी 79 लाख, तळसंगी 1 कोटी 9 लाख, माचणूर 60 लाख, डोंगरगाव 70 लाख, सिद्धापूर 31 लाख.