थकीत एफआरपी व दिवाळीला शेतकऱ्यांना साखर देण्यासाठी "भीमा'चे बंद गोदाम उघडा : जनहित शेतकरी संघटना  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anhit Sanghatna

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीसाठी साखरेची गरज आहे. मात्र साखरेच्या गोदामाला कुलूप असल्यामुळे साखर देता येत नाही. तसेच ऊस उत्पादकांची थकीत येणे बाकी 13 कोटी 50 लाख रुपये व्याजासह त्वरित देण्यासाठी कोणत्याही बॅंकेची कारखान्याला कर्ज मिळवण्याची गरज नाही. साखर विक्रीतून आर्थिक नियोजन होऊ शकते. त्यामुळे गोदामातील साखर विक्रीसाठी साखर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी भीमा कारखान्याला परवानगी द्यावी, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेने केली. 

थकीत एफआरपी व दिवाळीला शेतकऱ्यांना साखर देण्यासाठी "भीमा'चे बंद गोदाम उघडा : जनहित शेतकरी संघटना 

मोहोळ (सोलापूर) : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादकांची थकीत येणे बाकी 13 कोटी 50 लाख रुपये आहे. परंतु सध्या कारखान्याच्या गोदामात सुमारे 70 ते 80 कोटींची साखर शिल्लक आहे. दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांना साखर देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन कारखान्याच्या साखर गोदामातील साखर वाटप करण्यास कारखान्याला परवानगी द्यावी, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात श्री. देशमुख यांनी मागणी केली, की दिवाळी सण तोंडावर आला असून, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीसाठी साखरेची गरज आहे. मात्र साखरेच्या गोदामाला कुलूप असल्यामुळे साखर देता येत नाही. तसेच ऊस उत्पादकांची थकीत येणे बाकी 13 कोटी 50 लाख रुपये व्याजासह त्वरित देण्यासाठी कोणत्याही बॅंकेची कारखान्याला कर्ज मिळवण्याची गरज नाही. साखर विक्रीतून आर्थिक नियोजन होऊ शकते. त्यामुळे गोदामातील साखर विक्रीसाठी साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी भीमा कारखान्याला अधिकृत परवानगी द्यावी. 

बॅंकेच्या कर्जाबाबत कारखानदार त्या कुलुपाची जबाबदारी घेतील, परंतु आरआरसीच्या केलेल्या कारवाईदरम्यान महसूल विभागाने लावलेले कुलूप काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. साखरेच्या गोदामाला कुलूप लावून शेतकऱ्यांचे प्रपंच चालणार नाहीत, तर त्यासाठी साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी एफआरपीची थकीत रक्कम व दिवाळीला शेतकऱ्यांना साखर देण्यासाठी गोदाम खुले करावे, असे निवेदनात नमूद केले आहे. 

या वेळी विकास जाधव, कुमार गोडसे, नितीन जरग, चंदू निकम आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top