
सांगोला : श्री विठ्ठलाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी धडपडणाऱ्याला त्या पालखीचे नियोजन करण्याची संधी भाजपने दिली आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका संपल्या, आता पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ आली आहे. यापुढील काळात भाजपचा कार्यकर्ता जिल्ह्यात स्वाभिमानाने आणि सन्मानाने काम करेल, असे मत पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.