PNE20R08257_pr.jpg
PNE20R08257_pr.jpg

जिजाऊ ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्षपदी  उज्ज्वला साळुंके, शहराध्यक्षपदी संजीवनी मुळे 

Published on

सोलापूर  : महाराष्ट्र प्रदेश जिजाऊ ब्रिगेडच्या ऑनलाइन निवड प्रकियेनंतर सोलापूर जिल्हा अंतर्गत सोलापूर विभागाच्या अध्यक्षपदी प्रा. उज्ज्वला साळुंके यांची निवड जाहीर करण्यात आली. 
मराठा सेवा संघाच्या तिसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मानवंदना या कार्यक्रमप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या हस्ते साळुंके यांना निवडीचे पत्र देण्यात आले. तर जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्षपदी डॉ. संजीवनी मुळे यांची निवड करून जिल्हाध्यक्ष प्रा.उज्ज्वला साळुंके यांनी मुळे यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्ष निर्मला शेळवणे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधव, शहराध्यक्ष सदाशिव पवार उपस्थित होते. 
नूतन जिल्हाध्यक्ष सांळुके मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की जिजाऊ मॉंसाहेबांनी स्वराज्य निर्मिण्यासाठी कामी दोन छत्रपती घडविले व अन्यायाचा बिमोड केला, त्या आदर्शावर घराघरात जिजाऊंचा विचार पोहचविण्याचे काम आम्ही साऱ्याजणी मिळून करणार आहोत. यावेळी प्रशांत पाटील, दत्ता मुळे, निर्मला शेळवणे, डॉ. संजिवनी मुळे, सदाशिव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. 
याकार्यक्रमप्रसंगी गोवर्धन गुंड, आर. पी. पाटील, लता ढेरे, जीवन यादव, कल्याण गव्हाणे, नितिन जाधव, अभिंजली जाधव , प्रतिज्ञा भोसले, आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com