
-प्रमिला चोरगी
सोलापूर : महापालिकेने २०१६ मध्ये जुळे सोलापूर भाग दोन आणि हैदराबाद रोड विडी घरकुल या परिसराचा उपविकास आराखडे तयार केले. त्यांना २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. परंतु महापालिकेने सर्व उपआराखड्यांचे एकत्रिकरण करून नवा विकास आराखडा तयार करताना जुन्या उपआराखड्याचे भवितव्य संपुष्टात आणले आहे. यावर सत्ताधारी भाजप पक्षानेच आक्षेप घेतला आहे तर विरोधी पक्षातील काँग्रेस नेत्यांनी मात्र मौन बाळगले आहे.