भूमिका ठरवण्यासाठी काळे गट घेणार पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या गटनिहाय बैठका ! 

Kalyan_kale
Kalyan_kale
Updated on

भाळवणी (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काळे गटाची भूमिका ठरविण्यासाठी भाळवणी येथे भाळवणी गटातील 23 गावांची बैठक पार पडली असून, गटनिहाय 72 ग्रामपंचायतींच्या बैठका घेणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले. 

पंढरपूर तालुक्‍यात 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. तालुक्‍यात काळे, भालके, परिचारक हे तीन गट सक्षम असून, त्यांच्यामध्ये होणाऱ्या आघाडीवरूनच निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. तालुक्‍यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षीय राजकारणापेक्षा गटा - तटावरच होतात. कल्याणराव काळे यांच्या ताब्यात असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील भाळवणी, केसकरवाडी, पिराची कुरोली, जैनवाडी, उपरी, शेंडगेवाडी, पळशी, सुपली, वाडीकुरोली, देवडे, पटवर्धन कुरोली, गादेगाव, शेळवे, वाखरी, शिरढोण, कौठाळी, खेडभाळवणी, भंडीशेगाव, सोनके, बोहाळी, उंबरगाव, तिसंगी या गावांतील काळे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी गावनिहाय चर्चा करून काळे यांनी मार्गदर्शन केले. 

या वेळी निवडणुकीमध्ये गाव पातळीवरील स्थानिक मतभेद बाजूला ठेवून एकत्रित काम करण्याचे त्यांनी आवाहन केले. तालुक्‍यातील प्रत्येक गावात कल्याणराव काळे यांना मानणारा वर्ग असल्याने त्यांच्या भूमिकेवरच ग्रामपंचायतीच्या राजकारणाचे भवितव्य अवलंबून आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत काळे गट कोणती भूमिका घेणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विठ्ठल परिवार अखंडित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. शेवटी गावाच्या विकासाचे ध्येयधोरण ठरवून काम करणारे कार्यकर्ते सत्तेत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. 
- कल्याणराव काळे, 
अध्यक्ष, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
A demand has been made to provide five new MSRTC buses to the Mangalwedha ST Depot to improve passenger services.
How will B-2 land regularization benefit Solapur?
Marathi News Esakal
www.esakal.com