सोलापूरच्या सामान्य कुटुंबातील कपिल बेळमकर यांनी सीए फायनल नोव्हेंबर २०२४ परीक्षेत यश प्राप्त केलं आहे. कपिल बेलमकर हा बाहेर कोणताही क्लास न लावता घरी बसून ऑनलाईन क्लासेस पाहून अभ्यास करत. स्वयं अध्ययनाच्या जोरावर तो पास झाला आहे..यांच्या कुटूंबात आई, वडील, दोन बहिणी असा त्याचा परिवार आहे. वडील गोविंद बेळमकर हे कापड व्यवसायात आहेत तर आई हेमा बेळमकर या भावसार समाज महिला मंडळाच्या उपाध्यक्षा आहेत..CA Exam Topper 2024: हुर्रर्रर्रर्र...सीए परीक्षेत हेरंब माहेश्वरी आणि ऋषभ ओस्तवाल यांनी केले देशात टॉप, येथे पहा टॉपर्सची लिस्ट.कपिलची मोठी बहिण डॉ. कोमल बेळमकर या डॉक्टर असून दुसरी बहिण काजल बेळमकर या व्यवस्थापन क्षेत्रात आहेत. कपिलच्या कुटुंबात सर्व जण उच्च शिक्षित असल्याने कपिल चे देखील मोठा अधिकारी व्हायचे स्वप्न होते. यासाठी तो दिवसरात्र एक करत स्वयंअध्ययनासाठी काही विषयांचा अभ्यास करत व काही विषयांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन घेत होता. अगदी जोरकस पद्धतीने युट्यूबवर उपलब्ध असलेले ऑनलाईन क्लासेसवर अभ्यास केला. तसेच सीए दिलीप कासट व सीए एस.आर.गुंडेली यांनी मार्गदर्शन केले. तर सीए जी.जी.बोरगावकर यांच्याकडे आर्टीकलशीपचा अनुभव घेतला..यशाची पायाभरणी- अकरावीला सी.ए. होण्याचे ध्येय निश्चित- बारावी नंतर सी.ए.फाउंडेशनची परीक्षा उत्तीर्ण- ऑनलाईन क्लासेसवर काही विषयाची तयारी- स्वयं अध्ययनातून काही विषयाची तयारी- सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत सलग अभ्यास- कोणताही क्लास किंवा पदवी शिक्षण न घेता थेट सी.ए. परीक्षेत यश.उत्साही सहभागकपिलने हे यश मिळवत असताना सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला. काठीच्या कार्यक्रमात त्याने काठी धरण्याचे कार्य केले. तसेच नवरात्र उत्सवात तो नियमित सहभागी होतो. आजोबा गणपतीच्या लेझीम पथकात तो सदस्य आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.