Gram Panchayat Election : जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष; सरपंच पदासाठी तिरंगी लढत

सरपंच पदासाठी तिरंगी लढत माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील निवडणूक रिंगणात
karmala Jeur Gram Panchayat Elections for post of Sarpanch mla narayan patil prithviraj patil obc
karmala Jeur Gram Panchayat Elections for post of Sarpanch mla narayan patil prithviraj patil obc sakal

करमाळा : जेऊर (ता.करमाळा )ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.जेऊर ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील यांची 1992 पासून एकहात्ती सत्ता आहे. जेऊर ग्रामपंचायतचे सरपंच पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे.

या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव युवा नेते पृथ्वीराज पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या विरोधात आमदार संजय शिंदे गट व इतर पाटील विरोधक यांनी नितीन भैरू खटके यांना उमेदवारी दिली आहे.

याशिवाय बाळासाहेब एकनाथ करचे हे सरपंच पदासाठी अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे जेऊर ग्रामपंचायतची सरपंच पदाची निवडणूक तिरंगी होत आहे अपक्ष उमेदवार बाळासाहेब करचे यांनी गेली अनेक वर्षापासून जेऊर ग्रामपंचायतच्या कारभारावर आक्षेप घेत मोठा लढा उभारला होता.

सरपंच पदाची जागा ओबीसी साठी राखीव असल्याने या जागेवरती ओबीसी उमेदवारालाच प्राधान्य द्यावे अशी मागणी बाळासाहेब करचे यांची होती. त्यांची ही मागणी मान्य झाल्याने ते निवडणूक रिंगणात उतरले असल्याचे सांगण्यात येत आहे

ग्रामपंचायत सदस्य संख्या 15 असून जेऊर ग्रामपंचायतचे एकूण मतदान 5054 एवढे आहे. जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीत सर्व पाटील विरोधकांना एकञ करण्यासाठी आमदार शिंदे गटाकडून माजी पंचायत समिती सभापती चंद्रहास निमगिरे, माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील व इतर शिंदे समर्थकांनी प्रयत्न केले. माञ सरपंच पदासाठी बाळासाहेब करचे यांचा उमेदवारी अर्ज राहिला आहे.

जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माजी आमदार नारायण पाटील विरोधक माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील हे सरपंच पदाची निवडणूक लढवतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.

पृथ्वीराज पाटील विरूद्ध संग्राम पाटील या दोन्ही पाटलांमध्ये ही निवडणूक होईल असे वाटत असतानाच आमदार संजय शिंदे समर्थकांनी नितीन खटके यांची उमेदवारी एकमताने जाहीर केली. संग्राम पाटील यांनी उमेदवार अर्ज भरला नाही. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून नितीन खटके हे गेले अनेक वर्ष काम करत आहेत.त्याचा जनसंपर्क चांगला आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवण्यावर त्यांचा भर असतो.

1992 ला सुरुवातीला आमदार माजी आमदार नारायण पाटील हे जेऊर ग्रामपंचायतचे सरपंच झाले .तेव्हापासून जेऊर ग्रामपंचायत वरती पाटील यांची सत्ता आहे.नारायण पाटील यांची जेऊर ग्रामपंचायत घालवण्यासाठी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये बागल यांनी मोठी ताकद लावण्यात आल्याची उदाहरणे आहेत. मात्र प्रत्येक वेळी पाटील यांनी आपली सत्ता राखली आहे . जेऊर येथील बहुतांश बागल गटाचे कार्यकर्ते आमदार संजय शिंदे गटात गेले आहेत त्यामुळे पाटील यांच्या विरोधात लढणारे बहुतांश कार्यकर्ते हे पूर्वीचे बागल समर्थक आहेत.

यावेळी पाटील यांचे चिरंजीव स्वतः निवडणूक रिंगणात उतरले असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून पृथ्वीराज पाटील यांच्या विजयासाठी पाटील गटाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत ,तर कोणतेही परिस्थितीत पाटील गटाची सत्ता घालवायची यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. पाटील गटाचे कार्यकर्ते फोडण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.

त्याच पाटील गाटचे माजी उपसरपंच बलभीम जाधव यांनी आमदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. याची वेळी प्रवेश केलेले माजी उपसरपंच अंगद गोडसे यांनी मात्र आपल्याला फसवून शिंदे गटात प्रवेश घडून आणला माझा त्यांच्याशी काही संबंध नाही मी माझी आमदार नारायण पाटील यांचाच कार्यकर्ता असल्याचे जाहीर केले आहे.

या निवडणुकीत होणारे फोडाफोडीचे राजकारण कसे असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.त्यामुळे जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. माजी आमदार नारायण पाटील यांच्यासमोर सत्ता टिकवण्यासाठी तर पाटील विरोधी गट सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com