esakal | "आयपीएल' सट्ट्याचे कर्नाटक कनेक्‍शन ! पोलिसांनी जप्त केला 38.44 लाखांचा मुद्देमाल 
sakal

बोलून बातमी शोधा

4SATTA.jpg

बसवेश्‍वर नगरातून त्यांनी अतुल सुरेश शिरशेट्टी (रा. अवंती नगर) व प्रदीप मल्लय्या कारंजे (रा. भद्रावती पेठ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, एक टॅब, 13 मोबाइल, एक माईक, चार्जर, एक हॉटलाईन मशीन, मोडेम, सेटअप बॉक्‍स, टीव्ही, डीव्हीआर असा तीन लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एक वाहन आणि उर्वरित सट्टा लावण्याचे साहित्यही जप्त केले.

"आयपीएल' सट्ट्याचे कर्नाटक कनेक्‍शन ! पोलिसांनी जप्त केला 38.44 लाखांचा मुद्देमाल 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : अवंती नगरातील पर्ल हाईट्‌समधील प्लॉट नं. दोनमध्ये सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी चेतन रामचंद्र वन्नाल (रा. गांधी नगर झोपडपट्टी, अक्‍कलकोट रोड) आणि विग्नेश नागनाथ गाजूल (रा. भद्रावती पेठ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तब्बल 38 लाख 44 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. क्रिकेट सट्ट्याचे कनेक्‍शन कर्नाटकात असल्याचे पोलिस तपासांत समोर आले आहे. 


आयपीएलचा सामना कोण जिंकणार, टॉस कोण जिंकेल, सहा, दहा, 15 आणि 20 ओव्हरपर्यंत कोणत्या संघाच्या किती धावा होतील, यावर मोबाईलद्वारे सट्टा घेताना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले. सट्टेबाजांकडून जमा होणारी रक्‍कम, त्यांना मिळालेली रक्‍कम आणि त्यातून लाखो रुपयांचा सट्टा चालविणारे भागिदार तथा मालक भागिदारांना ज्यास्त रकमेचे अमिष द्यायचे. दरम्यान, कोरोनाच्या काळात साथ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास संबंधितांनी चालना दिल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुध्द दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे करीत आहेत. दरम्यान, चेतन वन्नाल याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनेच्या मुळाशी जावून तपास केला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे हे आपल्या पथकासह कलबुर्गीला पोहचले. बसवेश्‍वर नगरातून त्यांनी अतुल सुरेश शिरशेट्टी (रा. अवंती नगर) व प्रदीप मल्लय्या कारंजे (रा. भद्रावती पेठ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, एक टॅब, 13 मोबाइल, एक माईक, चार्जर, एक हॉटलाईन मशीन, मोडेम, सेटअप बॉक्‍स, टीव्ही, डीव्हीआर असा तीन लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एक वाहन आणि उर्वरित सट्टा लावण्याचे साहित्यही जप्त केले.

सराईत गुन्हेगार सुलतान कुरेशी स्थानबध्द 
फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सुलतान याकुब कुरेशी (वय 30, रा. हाजीमाही चौक, शुक्रवार पेठ) याला पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी आज स्थानबध्द केले. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कुरेशी याने कुरेशी गल्ली, पाणीवेस, दत्त चौक, पंचकट्टा, विजापूर वेस, शुक्रवार पेठ, उत्तर कसबा परिसर, लक्ष्मी मार्केट, मुलाबाबा टेकडी, खाटीक मश्‍जिद, माणिक चौक, सोलापूर- विजयूपर रोड याठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, पशु क्रूरता, खंडणी मागणे, जबरी चोरी, प्राण्यांचा छळ करुन त्यांची तस्करी करणे अशा स्वरुपाचे गुन्हे त्याच्या नावे दाखल आहेत. गुन्ह्यांद्वारे त्याने सार्वजनिक हितास बाधा निर्माण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. 2012 पासून कुरेशी याच्यावर मंद्रूप पोलिसांत व फौजदार चावडी पोलिसांत तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी कारवाई करुनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्याच्याविरुध्द आता स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस आयुक्‍तांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.