Kharif preparations begin in Mohol taluka; sowing targeted over 30,000 hectares as fertilizer costs loom.
Kharif preparations begin in Mohol taluka; sowing targeted over 30,000 hectares as fertilizer costs loom.Sakal

Kharif Season: 'मोहोळ तालुक्यात खरीपाची चाहूल'; तीस हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन, खतांच्या किंमती वाढणार

वातावरण बदलल्याने उन्हामुळे पिवळी झालेली पिके हिरवी दिसू लागली आहेत. बैलांची संख्या कमी झाल्याने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही. बैलांची संख्या कमी झाल्याने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही.
Published on

मोहोळ : खरीप हंगामाची नुकतीच चाहूल लागली. असून, मोहोळ तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. दरम्यान कृषी .विभागाने चालू खरीप हंगामात 29 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीचे नियोजन केले आहे. गेल्या आठवड्यात मोहोळ तालुक्यात चांगल्या दोन पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे उन्हाळ्याची धग कमी झाली आहे. वातावरण बदलल्याने उन्हामुळे पिवळी झालेली पिके हिरवी दिसू लागली आहेत. बैलांची संख्या कमी झाल्याने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही. मोहोळ तालुक्याचे सरासरी पेरणी क्षेत्र 27 हजार 499 हेक्टर आहे. चालू वर्षी लवकरच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उठली आहे. बाजारात बियाणे खरेदीसाठी कृषी साहित्याच्या दुकानात गर्दी होताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com