esakal | खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत !
sakal

बोलून बातमी शोधा

Crop Insurance

खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत !

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

सोलापूर : खरीप हंगामासाठी (Kharif season) पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी (Prime Minister Crop Insurance Scheme) शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. पीक विमा योजनेसाठी 2021 या हंगामाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ www.pmfby.gov.in कार्यान्वित झालेले आहे. (Kharif season crop insurance term till 15th July)

हेही वाचा: "जि. प. कर्मचाऱ्याचे 21 लाखांचे वैद्यकीय बिल दोन आठवड्यांत द्या!'

जिल्ह्यातील अधिसूचित क्षेत्रातील पिकासाठी पीक विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 साठी भारती ऍक्‍सा जनरल एन्शुरन्स कं. लि. (Bharti Axa General Insurance Co. Ltd.) या विमा कंपनीची नेमणूक केली आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी/लावणी न झाल्यास विमा संरक्षण, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण मिळणार आहे.

योजनेत समाविष्ट पिके

जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कांदा पिकांचा समावेश करण्यात आला आहे. भुईमूगसाठी शेतकरी हिस्सा 350 रुपये, विमा संरक्षित रक्कम 17500 रुपये आहे. खरीप ज्वारीसाठी शेतकरी हिस्सा 460 रुपये, विमा संरक्षित रक्कम 23 हजार रुपये आहे. बाजरीसाठी 330 रुपये शेतकरी हिस्सा असून विमा संरक्षित रक्कम 16,500 रुपये आहे. सोयाबीनसाठी 680 रुपये शेतकरी हिस्सा असून विमा संरक्षित रक्कम 34 हजार रुपये, मुगासाठी 360 रुपये, विमा संरक्षित रक्कम 18 हजार रुपये, उडीद 380 रुपये, विमा संरक्षित रक्कम 19 हजार रुपये, तूर 550 रुपये, विमा संरक्षित रक्कम27 हजार 500 रुपये, मका 110 रुपये, विमा संरक्षित रक्कम 5500 रुपये, कांदा 2750 रुपये विमा संरक्षित रक्कम 5500 रुपये अशी आहे.

loading image