
पंढरपूर :‘सांगा मी काय करू...भक्ती करू की पोट भरू..’, ‘कांदा मुळा भाजी...अवघी विठाई माझी..’ अश्या नानाविध भक्तिगीताद्वारे पंढरपूर सध्या भक्तिमय झाले आहे. पंढरीत कोणी आरोग्यसेवा, कोणी तृष्णातृप्ती, कोणी चपला शिवून देतोय .. व्यक्तीनुरुप भक्तीमार्ग वेगळे असले तरी सर्वांचा उद्देश एकच...विठ्ठलभक्ती.