
मोहोळ : गांजाच्या केससाठी झालेल्या खर्चाचे सात लाख रुपये दिल्याशिवाय एकाला सोडणार नाही, असे म्हणत पैसे जर नाही दिले तर त्याला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन सात ते आठ लोकांनी कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने एकाचे अपहरण केल्याची घटना २४ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील अनगरपाटी जवळ घडली. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने गुन्हा दाखल केला आहे.