

Women's Safety in Crisis: Advocate Komal Salunkhe-Dhobale Slam CM Devendra Fadnavis
Sakal
मंगळवेढा : भोर तालुक्यातील नसरापुरात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तीची निर्घूण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा करा म्हणून अखंड महाराष्ट्र रस्त्यावर उतरला आहे, पण तुम्ही कसली वाट बघत आहात? असा सवाल करीत कोणतीही घटना स्वतःच्या घरात किंवा स्वतः सोबत घडल्याशिवाय त्या घटनेचं गांभीर्य कळत नसेल तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ नसरापूर घटनेतील त्या आरोपीला दत्तक घ्यावे यातून तो किती क्रुर वृत्तीचा गुन्हेगार, खुनी आहे हे कळेलच आणि पक्के पुरावे पण मिळतील. पण एका लेकीचा बाप म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला आपणाकडून ही अपेक्षा नव्हती, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली.