
सोलापूर : भाजपची बाजू उचलून धरणारे सपाटे हे भाजपमध्ये कधी गेले, असा प्रश्न उपस्थित करीत महेश कोठे यांनी स्वतंत्र पत्रक काढून सपाटेंचा खरपूस समाचार घेतला. जाणता राजा कार्यक्रम, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मानपत्र देण्याचा कार्यक्रम, किल्लारी भुकंपातील मदतीच्या रकमेत सपाटे यांनी मोठा पैसा खाल्ला असा आरोप कोठे यांनी केला. तर कोठे यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर मांडावेत, मी राजकारण सोडून देतो असे आव्हान सपाटे यांनी दिले आहे.
सभागृहनेते मुदतवाढीसाठी लाचार
शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना श्रीनिवास करली यांना त्याचे गांभीर्य नाही. त्यांनी विडी घरकूलचा अभ्यास करण्यापेक्षा आणि तेथील नागरिकांची चिंता करण्याऐवजी त्यांच्या प्रभागातील टॅंकर बंद करुन दाखवावे. करली हे अभ्यासू नाहीत, परंतु त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी आहे, असा प्रश्न उपस्थित करीत कोठेंनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर निशाणा साधला. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात मी उभारणार असल्याची चिंता काहींना आतापासूनच लागली आहे, असेही कोठे यांनी सांगितले.
महापालिकेत सत्तेवर असताना कोठे की सपाटे यांनी भ्रष्टाचार केला, याचे उत्तर जनतेने द्यावे. कोण कसा आहे, हे जनतेला माहिती आहे. महापालिकेतील अनेक कर्मचारी सपाटेंच्या त्रासाला कंटाळून घरी बसले तर काहींनी आत्महत्या केल्याचा आरोप कोठे यांनी त्यांच्या पत्रकातून केला आहे. तसेच किल्लारी येथील भुकंपावेळी सपाटे यांनी पत्र्यासह अन्य मदतीत मोठी रक्कम स्वत: हडप केली. जाणता राजा कार्यक्रमाचा हिशोब त्यांनी दिलाच नाही. स्वरसम्राज्ञी लता दिदींना महापालिकेकडून मानपत्र देण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी वस्तू खरेदीच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि त्या कार्यक्रमातील वस्तू व साड्या सपाटे यांनी घरी नेल्याचाही आरोप कोठे यांनी केला. झोपडपट्टीत राहणारे सपाटे कोट्यधीश झालेच कसे, याचे तंत्रज्ञान त्यांनी सर्वसामान्यांना सांगितल्यास शहरातील झोपडपट्टीतील लोकही कोट्यधीश होतील, असा टोलाही त्यांनी पत्रकातून लगावला आहे. तर सपाटे म्हणाले, भुकंपात मदत केल्याचे कौतूक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सभागृहात केले होते. तर कष्ट, जिद्द आणि चिकाटीतून मी मोठा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.