esakal | कोविड रुग्णांनी घेतला योगासने व ध्यान सरावाचा आनंद 
sakal

बोलून बातमी शोधा

yoga covid shibir.jpg

वीरशैव मंगल कार्यालयातील कोव्हिड सेंटरमध्ये उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले व तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या पुढाकारातून पॉझिटिव्ह रुग्णांना एकटेपणा जाणवू नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने आयोजित शिबिराची सांगता आज करण्यात आली. 

कोविड रुग्णांनी घेतला योगासने व ध्यान सरावाचा आनंद 

sakal_logo
By
हुकूम मुलानी

मंगळवेढा (सोलापूर) : कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या मनातील भीती दूर व्हावी व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने पतंजली योग समितीच्या वतीने कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी सहा दिवसांचे योग-प्राणायाम व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

हेही वाचाः माझी रायगडवारी 

वीरशैव मंगल कार्यालयातील कोव्हिड सेंटरमध्ये उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले व तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या पुढाकारातून पॉझिटिव्ह रुग्णांना एकटेपणा जाणवू नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने आयोजित शिबिराची सांगता आज करण्यात आली. 

हेही वाचाः आमदार यशवंत माने ः भागाई विकासाचे मॉडेल 

या शिबिरात सूर्यनमस्कार, योगिक, जॉगिंग, मण्डुकासन, मर्कटासन, भुजंगासन यासारखी आसने, भस्त्रिका, कपालभाती, उज्जायी, अनुलोम-विलोम, भ्रामरी, ओंकारनाद व ध्यान, ऍक्‍युप्रेशर, घरगुती औषधे इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन देखील करण्यात आले. या शिबिरात जलनेती सारख्या शरीर शुद्धिक्रिया करून आपण कोरोना संक्रमण रोखू शकतो व संक्रमित झाल्यानंतर लवकर बरे होण्यासाठी जलनेती आपल्याला मदत करते. या शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष नितीन मोरे, भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी संतोष दुधाळ, महिला पतंजली तालुका प्रभारी प्रफुल्लता स्वामी,भारत स्वाभिमान तालुका प्रभारी व भा. ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, कोषाध्यक्ष शिवकुमार स्वामी यांनी मार्गदर्शन केले. हे शिबिरासाठी प्रकाश स्वामी, गौरीहर बुरकुल, आगतराव बिले, महादेव पिसे, शिवाजी कोंडूभैरी यांनी परिश्रम घेतले. 

प्रतिकारक्षमतेचा विकास 
कोरोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासलेले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग म्हणजे आपली इम्युनिटी मजबूत बनवणे. इम्युनिटी वाढवण्यासाठी योग तुम्हाला मदत करतो किंबहुना कोरोनावरील रामबाण औषध म्हणजे योग आणि प्राणायाम आहे. 
- नितीन मोरे,जिल्हाध्यक्ष,पतंजली योग समिती 

नैराश्‍यातून बाहेर पडण्याची गरज 
पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये निर्माण झालेले नैराश्‍य व एकटेपणा घालविण्यासाठी योगाची आवश्‍यकता आहे. त्यादृष्टीने कोवीडशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी व कोरोना ची साखळी तुटण्याच्या दृष्टीने कोविड सेंटरमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. 
-उदयसिंह भोसले उपविभागीय अधिकारी  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

loading image
go to top