
सोलापूर : युद्धाचे पडघम वाजू लागले की पतीचे हौतात्म्य आठवते. या पेटलेल्या बर्फातील युद्धाला पतीच्या, मुलाच्या हौतात्म्याची धग आहे. भारताने दहशतवादी तळांवर केलेला एअरस्ट्राईक योग्यच आहे. दहशतवाद्यांनी निष्पापांचा बळी घेतला होता. त्याचा भारताने बदल घेतला आहे. भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी खरोखरच अभिमानास्पद आहे. कारवाईमुळे भारताच्या लेकींना न्याय मिळाला, अशी भावना वीरमाता, वीरपत्नी यांनी व्यक्त केली. पहलगाम येथील अतिरेकी हल्ला व त्यानंतर भारताने दिलेल्या लष्करी प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहीद सैनिकांचे स्मरण केले गेले. शहिदांच्या वीरपत्नींनी त्यांच्या पतीच्या काश्मीरमधील शौर्याच्या आठवणींना मनोगतातून उजाळा दिला.