

Solapur
esakal
अक्कलकोट: अक्कलकोट तालुक्याची वरदायीनी असलेल्या कुरनूर धरणात पावसाळा सुरू होऊन एक महिना लोटत आला तरी केवळ 25 टक्के पाणीसाठा राहिल्याने तो चिंतेचा विषय बनलेला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात 12 जूनलाच कुरनूर धरण शंभर टक्के तुडुंब भरून राहिले होते पण आता साठा केवळ 25 टक्के असल्याने पाण्याचे पातळी ही तळाला गेल्याने आणि पाऊस सुद्धा सध्या अद्याप सुरू न झाल्याने अक्कलकोट शहर व तालुक्यातील पूर्व भागातील बोरी नदीकाठच्या शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचा विषय बनून राहिलेला आहे.