पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे सर्वसामान्य वारकऱ्यांची जशी मांदियाळी असते तशी राजकीय नेत्यांची व प्रशासनातील अधिकाऱ्यांचीही नेहमीच रेलचेल असते.
पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Vitthal-Rukmini Temple) परिसरातील प्रस्तावित काॅरिडाॅरची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार (Mahayuti Government) आल्यानंतर काॅरिडाॅर होणार या चर्चेला जोर आला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह (Pandharpur city) लगतच्या गावातील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. शासकीय मूल्यापेक्षा बाजारभाव पाच पटीने वाढला आहे.