Paint spilled across a classroom after unknown persons damaged school property at Laul Zilla Parishad School.
esakal
वसंत कांबळे,
लऊळ : येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत समाजकंटकांचा सुळसुळाट वाढला असून, शाळेच्या मालमत्तेचे वारंवार नुकसान होत आहे. गेल्या महिन्यात शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याची घटना ताजी असतानाच, आता दिवाळीच्या सुट्टीत अज्ञात व्यक्तींनी वर्गात घुसून रंगाच्या पाच बादल्या फोडून रंग सांडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गावातील या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थेच्या सुरक्षेकडे ग्रामपंचायत प्रशासकाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.