कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ 

 Launch of Agriculture Revitalization Week
Launch of Agriculture Revitalization Week
Updated on

सोलापूर : देशातील विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. शेतकरी डोळ्यासमोर ठेवून सरकार व कृषी विभाग प्रयत्नशील आहे. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता आणि उत्पन्नातील वाढ या त्रिसूत्रीचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे माहिती कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी दिली. आत्मा सभागृहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात श्री. माने बोलत होते. 

कृषी संजीवनी सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी विभागीय कोरडवाहू संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अमृत सागर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकने, श्री. सदाफुले, कृषी विकास अधिकारी श्री. कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार आदी उपस्थित होते. श्री. माने यांनी वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील कामाचे महत्व यावेळी सांगितले. कृषी संजीवनी सप्ताहामध्ये कृषी तंत्रज्ञान परिणामकारक होण्यासाठी प्रचार व जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी खरीप हंगामाबाबत मार्गदर्शन केले.

अमृत सागर यांनी जिल्हा खरीप हंगामामध्ये समाविष्ट केल्याबद्दल समाधान व्यक्त करून खरीप पिकाच्या शिफारशीबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या प्रांगणामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण झाले. यावेळी विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ. मंजुनाथ पाटील, तंत्र अधिकारी श्री. माळी, कृषी अधिकारी श्री. नारायणकर, सचिन चव्हाण आदींसह शेतकरी, कृषी मित्र उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक राठोड यांनी केले तर आभार दक्षिण तालुका कृषी अधिकारी श्री. वाघमोडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

How was salt sold as fertilizer in Maharashtra?
Will Solapur IT Park shift from Hotgi Road?
Barshi Shocked by Death of Headmaster, Wife and Two Sons; Police Investigating Case
barshi crime
Marathi News Esakal
www.esakal.com