Sharada Ekar : पतीच्या इच्छेखातर मुलीला बनविणार वकील

टी सेंटर चालवून एकट्याने जबाबदारी पेलणाऱ्या सोलापुरातील शारदा यांची कहाणी
Sharada Ekar and Sanskruti Ekar
Sharada Ekar and Sanskruti Ekarsakal

सोलापूर - माहेरची परिस्थिती बिकट असताना त्यांच्या परवानगीनेच प्रेमविवाह केला. पुणे व सोलापूर येथे पतीने रोजगारासाठी विविध कामे करून संसाराचा गाडा हाकला. या दरम्यान दोन मुलीही झाल्या. संसार चांगला सुरू असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पतीचे निधन झाले, मात्र कोसळलेल्या संकटाच्या डोंगरातून मार्ग काढत चहा सेंटर चालवून जबाबदारी पेलणाऱ्या शारदा यांना आता मुलीला वकील करायचे आहे.

मुलगी वकील व्हावी ही शारदा यांच्या पतीची इच्छा होती. संसाराला काही कमी पडू नये यासाठी ते जीवापाड मेहनतही करत होते. मात्र कोरोनाने त्यांना हिरावले. सोलापूरच्या शारदा महेश एकार या आता पतीच्या पश्‍चात मयुरी टी- सेंटर चालवत आहे. चहा अनेक ठिकाणी मिळतो मात्र मयुरी टी सेंटरच्या चहाची चवच न्यारी. जो एकदा या ठिकाणी चहा प्यायला येईल तो वारंवार येणारच असे त्यांच्या चहाचे वैशिष्ट्य. होटगी रोडवरील हेरिटेज हॉलसमोर त्यांचे मयुरी टी सेंटर आहे. शारदा यांचे लग्नाअगोदर माहेरची परिस्थिती बिकट असल्याने विडी काम करत घरातच छोटसं किराणा दुकान होते. नवरा महेश एकार हे कामानिमित्त सोलापूर आले, आणि परिवाराच्या सहमतीने शारदा आणि महेश यांचा प्रेम विवाह झाला. २००६ ला प्रेमाने सुखाचा संसार थाटला आणि रोजगारासाठी पुणे शहरात राहायला गेले.

दोन मुली आणि नवरा बायको असा शारदा महेश एकार यांचा परिवार पूर्ण झाला. नंतर आपला गाव बरा म्हणत त्यांनी सोलापूरमध्ये येऊन टी-सेंटर, खानावळीचा व्यवसाय नव्याने सुरू केला. व्यवसायाला हातभार लागावा म्हणून विडीकाम देखील सुरु केले. मात्र या आनंदाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दृष्ट लागली. पतीच्या निधनामुळे शारदा यांच्यावर जबाबदारीचे ओझे आले. पण न डगमगता आणि कोणाचाही फारसा आधार न घेता त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. भाड्याच्या घरात राहून मुलीला चांगले शिक्षण देण्यासाठी टी-सेंटर सांभाळत विडीकाम देखील करत आहेत.

  • संघर्षमय प्रवासात मुलींसाठी जिद्द

  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पतीचे निधन

  • चहा सेंटरसोबत विडी वळण्याचेही काम

  • बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न

दोन वर्ष झाले माझ्या वडिलाने निधन होऊन. मी आई आणि माझी लहान बहीण असा तीन जणांचा परिवार आहे. वडिलानंतर सर्व जबाबदारी आईवर आली. माझ्या आईने कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी माझ्या वडिलांचं स्वप्न एक दिवस पूर्ण करेन आणि आईला खुश ठेवेन.

- संस्कृती एकार, शारदा यांची मोठी मुलगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com