येरमाळा - जिल्हा पोलिस प्रशासनाकडून महामार्गावरील चोरट्यांवर निर्बंध घालण्यासाठी गस्त वाढवल्याचे सांगण्यात आले असले तरी राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा येथील उत्तम हॉटेल जवळ काल एका वाहनातून चार दारूच्या बॉक्सची चोरी गेल्याची घटना घडली. यावरून जिल्हा पोलिस प्रशासनाने काय उपाय योजना केल्या,गस्त पथक नेमूनही महामार्गावर रविवारी चोरीचा प्रकार घडला.