सोलापूर: कधीतरी लहानपणी मनाच्या कोपऱ्यात जपलेली चित्रकलेची आवडीला शिक्षण, विवाह, करिअर नंतर न्याय देत सुजाता कदम यांनी स्वतःला कलावंत म्हणून विकसित केले. आज त्यांची लिजंड्स ऑफ म्युझिक ही संगीत कलावंताची चित्रमालिका रसिकांच्या पसंतीला उतरली आहेत..सुजाता कदम यांचे माहेर पंढरपूर. लहानपणी शाळेत चित्र काढण्याची आवड होती. पण त्यावेळी शालेय शिक्षणात चित्रकलेला फार महत्त्व दिले जात नव्हते. घरातही चित्रकलेचा कोणता वारसा नव्हता. त्यामुळे पुढील शिक्षणात ही कला मनाच्या कोपऱ्यातच राहिली..Nagfani Creation: श्री सिद्धरामेश्वर यात्रेत खेळणी, नागफणी बनविण्याचा मान ‘गणेचारी’ कुटुंबाला.विज्ञान शाखेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी फार्मसीचे शिक्षण घेतले. विवाहानंतर मेडिकलवर जॉब सुरू झाला. याही स्थितीत चित्रकला कुठे शिकायला मिळेल याचा शोध सुरू होता. अचानक ज्येष्ठ चित्रकला शिक्षक पुष्कराज गोरंटला यांच्या क्लासचा शोध गुगलवर लागला. त्यांनी पत्ता शोधून क्लास लावला. तरीही नोकरीत क्लास करण्याचा प्रश्न होताच. त्यांनी सकाळी आठ वाजता क्लास करून नंतर नोकरीवर जाण्याचा दिनक्रम सुरू केला. त्यांच्या या परिश्रमाची नोंद घेत लिओनार्दो आर्ट अकॅडमीचे कला शिक्षक गोरंटला यांनी त्याची आवड समजून घेत त्यांना पेन्सिल शेडमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. साध्या पेन्सिलने रेखाचित्र निर्मितीची ही प्रक्रिया सुरू झाली..त्या नोकरी, क्लास व घरातील सर्व कामे संपवून मध्यरात्रीपर्यंत चित्रे काढतात. यातूनच त्यांनी लिजंड्स ऑफ म्युझिक ही चित्र मालिका तयार केली. त्यामध्ये पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, बालगंधर्व, रशीद खान आदी तीस कलावंतांच्या चित्रांचा समावेश आहे.त्यांच्या या चित्रांना कलावंत सहकारी संस्थेच्या प्रदर्शनात स्थान मिळाले. अत्यंत साधे पेन्सिल शेडमधील ही चित्रे रसिकांच्या पसंतीला उतरली. या महिन्यात सोलापुरात होणाऱ्या चित्रप्रदर्शनासाठी देखील त्यांच्या चित्रांची निवड झाली आहे..- लहानपणीच चित्रकलेची आवडीचा विकास- कुटुंब, करिअर सांभाळत कलेचे शिक्षण- पेन्सील शेड फॉर्ममध्ये चित्र निर्मिती- ३० संगीत कलावंताची चित्रमालिका.पुढील काळात मी ऑईल पेंटिंग व नेचर पेटींगमध्ये काम करणार आहे. या निर्मितीसाठी कुटुंबीयांचे पाठबळ मिळाल्याने मी इतकी प्रगती करू शकले.- सुजाता कदम, इंदिरा नगर, विजापूर रोड, सोलापूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.