esakal | खबरदारी...! आजारी पडल्यास रहा शाळेपासून दूर ; ही घ्या दक्षता
sakal

बोलून बातमी शोधा

खबरदारी...! आजारी पडल्यास रहा शाळेपासून दूर ; ही घ्या दक्षता

 

 

 

शहरातील शाळांना पाठवले पत्र 
राज्य शिक्षण परिषदेकडून आलेल्या पत्रानुसार कार्यवाही ठेवण्याच्या सूचना शहरातील 406 शाळांना पाठविल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या 58 शाळांचा समावेश आहे. केलेल्या कार्यवाहीची माहितीही देण्याची सूचना संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना केली आहे. 
- कादर शेख, प्रशासनाधिकारी 
सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ 

खबरदारी...! आजारी पडल्यास रहा शाळेपासून दूर ; ही घ्या दक्षता

sakal_logo
By
विजयकुमार सोनवणे

सोलापूर : "आजारी पडल्यास शाळेपासून दूर रहा, तसेच नियमितपणे साबणाने हात धुवा' या सूचनांसह कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता घेण्यासंदर्भात आरोग्य विभागाने महापालिका शिक्षण मंडळांना पत्र पाठविले आहे. करोनाचा जगभर फैलाव होत असताना राज्यातील शालेय विद्यार्थ्यांनाही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा संसर्गजन्य रोग असल्याने काळजी घेण्याबाबत केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने राज्याच्या शिक्षण विभागांना पत्र पाठविले आहे. त्याची प्रतही पाठवली आहे. 

जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरसमुळे चिंतेत आहेत. हा संसर्गजन्य रोग आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लस नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय महत्वपूर्ण ठरतात. रोगाचा वाढता फैलाव लक्षात घेता विविध पातळवीर खबरदारी घेतली जात आहे. सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणांचा विचार करता तेथे काळजी घेण्याबाबत विविध विभागांना सूचना देण्यात येत आहेत. राज्यातील शाळांनाही खबरदारी अन्‌ विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शिक्षण मंडळांना पत्रात म्हटले आहे कि, 'कोरोना व्हायरसमुळे चीनसह देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने तो न पसरू देण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. यावर प्रतिबंधक लस उपलब्ध नसली तरी खबरदारी घेऊन या आजारास रोखता येईल. त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी शाळा स्तरावर विविध उपाययोजना कराव्यात. 

ही घ्यावी दक्षता 
- खोकला, शिंकताना तोंडात रुमाल वापरणे 
- आजारी पडल्यास शाळेपासून दूर रहाणे 
- नियमितपणे साबणाने हात धुवावे 
- शिंकताना टिश्‍यू पेपर किंवा कोपऱ्याने नाक झाकावे 
- खोकला, तापाची लक्षणे दिसणाऱ्यांपासून दूर रहावे 
- खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णालयात दाखवा 

माहितीपत्रके तयार केली
सोलापूर शहरात आतापर्यंत पाचजण निगराणीखाली असले तरी त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, त्यामुळे चिंतेची बाब नाही. तथापि शासनाच्या सूचनेनुसार पूर्वदक्षता घेण्यासंदर्भात आम्ही माहितीपत्रके तयार केली आहेत. ती लवकरच वितरीत करण्यात येणार आहेत. 
- डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी 
सोलापूर महापालिका