
माळशिरस :अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून करण्यासाठी गेलेल्या आरोपीने त्याच्याऐवजी त्याच्या पत्नीचाच खून केला. याप्रकरणी माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. हुली यांनी आरोपी महादेव विष्णू थिटे (वय ५२, रा. बचेरी ता. माळशिरस) यास जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत फिर्यादीने माळशिरस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.