रुग्णांची यादी सोशल मीडियात झळकल्याने "या' तालुक्‍यात उडाली खळबळ 

Corona1
Corona1
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यात आढळलेल्या सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे प्रशासनाने कडक कारवाई करत शहरातील एका खासगी रुग्णालयास सील केले असून, त्यामधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे देखील स्वॅब घेतले आहेत. परंतु रुग्णांची यादी सोशल मीडियात आल्याने खळबळ उडाली आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासनाने कोरोनाचा अटकाव करण्यासाठी असलेल्या उपायांचे पालन करण्याचे आवाहन करूनदेखील काही नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे अखेर पोलिस कारवाई करणे भाग पडले. त्यामध्ये जवळपास 1288 लोकांवर कारवाई करून पावणेदोन लाखाचा दंड वसूल करण्यात आला. ग्रामीण भागात इतर ग्रामपंचायतींनी देखील यामध्ये सक्रिय सहभागी होऊन गावात बिगर मास्क फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. याकडे बहुतांश ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केले आहे. 

दरम्यान, शहरात दोन व ग्रामीण भागात चार रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने ते परिसर सील केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. नगरपालिका हद्दीत फवारणी करण्यात आली. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. दरम्यान, सोशल मीडियामध्ये खासगी दवाखान्यात उपचार केलेल्या 532 रुग्णांची यादी प्रसिद्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. त्यामुळे या यादीत आपल्या गावातील कोण आहे का? याचा शोध नागरिक घेऊ लागले. तर रुग्णालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. हा दवाखाना शहरापासून बाहेर असल्याने व अनेकांना दवाखाना सील केल्याबाबत माहिती नसल्याने सोशल मीडियावर ही माहिती समजताच संबंधित हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांच्या मनात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले म्हणाले, तशी परिस्थिती असती तर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कर्मचारी आदी पॉझिटिव्ह आले असते. विनाकारण भीतिदायक वातावरण केले जात असल्याने जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संबंधित दवाखान्यात उपचार घेतलेल्या रुग्णाला खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन केले असून कर्मचाऱ्यांचे देखील स्वॅब घेतले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com