#Lockdown : रुग्णालयात जाणाऱ्यांची संख्या आहे जास्त! 

#Lockdown : रुग्णालयात जाणाऱ्यांची संख्या आहे जास्त! 
Updated on

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लावलेल्या संचारबंदीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत आहेत. संचारबंदी लागू झाल्यानंतर सुरवातीच्या टप्प्यात भाजीपाला आणि किराणा मालाचे कारण सांगून अनेकजण रस्त्यावर येत होते. आता मात्र बहुतांश लोक रुग्णालयात, मेडीकलला जायचे आहे, असे सांगून वाहने घेऊन रस्त्यावर येत आहेत. 

संचारबंदी असतानाही अनेकजण सकाळी, सायंकाळी वॉकींगसाठी बाहेर पडत आहेत. काही ठिकाणी कारवाई करण्यात आली मात्र लोकांमध्ये बदल होत नसल्याचे दिसून येत आहे. नाकाबंदीत तर वेगवेगळी कारण घेऊन लोक रस्त्यावर येत असल्याचे दिसत आहे. महत्वाचे कारण वाटले नाहीतर पोलिस नाकारतात तेव्हा मात्र काहीजण पोलिसांसोबत वाद घालतात. काही टवाळखोर आजही सहज म्हणून बाहेर पडत आहेत. 

आम्हाला होटगी रोडवर सावस्कर हॉस्पिटलसमोर फिक्‍स पॉईंट नाकाबंदी आहे. सध्या रस्त्यावर वाहने घेऊन येणाऱ्यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच मेडीकलला जायचे असल्याचे कारण सांगत अनेकजण घराबाहेर पडत आहेत. नाकाबंदीत अडवल्यानंतर काही मंडळी पोलिसांसोबत वाद घालतात. तर काहीजण आपली अडचण सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. 
- योगेश वेळापूरे, 
सहायक पोलिस निरीक्षक 

-- 
आमची नाकाबंदी सगलर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. याठिकाणी बरेचजण रुग्णालयात जाण्याचे कारण सांगून बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे. काहीजण नियमीतपणे शेताकडे जाणारेही आहेत. दुधवाले, अत्यावश्‍यक सेवेत असलेले कर्मचारी यांनाही संचारबंदीत बाहेर पडावे लागत आहे. टवाळखोर तरुणांना आम्ही नाकाबंदी अडवतो, त्यांच्यावर कारवाई करतो. 
- श्‍वेताली सुतार, 
पोलिस उपनिरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

2,500 Kg of Essentials Donated to Gaushala in Remarkable Women-Led Initiative
zp schools
Gutka and mava are being sold openly in Solapur
Dumper Rams Motorcycle in Karamba, Leaving One Dead; Public Fury Erupts
Marathi News Esakal
www.esakal.com