Madha Lok Sabha : माढ्यात 'मान न मान मैं तेरा मेहमान!' नेत्यांच्या अनपेक्षित भेटीगाठी; कार्यकर्ते अचंबित

माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? लढत कोणात होणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
Madha Lok Sabha
Madha Lok SabhaeSakal

Madha Lok Sabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एरवीही, लोकांकडे, त्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी, नेते मंडळी सध्या गावोगावच्या यात्रा- जत्रा व पूर्वनियोजित कार्यक्रमांचे निमंत्रण नसतानाही अवचित दाखल होत आहेत. त्यामुळे अचंबित होत लोक सहजच प्रतिक्रिया उमटत आहेत. बिन बुलाये मेहमान, कारण... राजकारण, मान न मान मै तेरा मेहमान!

माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? लढत कोणात होणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. केवळ भाजपनेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारीची संधी देऊन रणांगणात उतरविले आहे. त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. महाआघाडीचा उमेदवारच अद्याप जाहीर नाही, तरीही संपूर्ण माढा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघत आहे.मत

दारसंघाचा विस्तार पाहता उमेदवारांना मतदारसंघातील प्रत्येक गावात पोचणे, तेथील नेत्यांशी चर्चा करणे, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे अशक्य होणार आहे. त्यासाठी प्रचाराचे नियोजन केले आहे. लोकप्रतिनिधी, स्थानिक नेत्यांनी आपल्या भागावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठी व वरिष्ठांकडून दिल्या आहेत. अनेक जण जबाबदारी पार पाडण्याच्या निमित्ताने, तर काही जण पॅकेजच्या आशेने झाडून कामाला लागले आहेत. कालचे विरोधक आज एकाच व्यासपीठावर गप्पा मारताना दृष्टीस येत आहेत.

Madha Lok Sabha
Madha Lok Sabha : "माढ्यात भाजपच्या विरोधात वातावरण", राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळेंची कबुली; विठ्ठल परिवाराची बैठक

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, हे जरी सत्य असले, तरीही एकमेकांची डोकी फोडणारे आणि एकमेकांतून विस्तवही जाणार नाही, असे सर्वसामान्यांना वाटत असतानाच नेते मात्र, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू सत्तेच्या माळा... म्हणत गळ्यात गळे घालत आहेत.

सध्या रब्बी हंगाम संपल्याने गावोगावी पारायणे, वार्षिक यात्रा, जत्रांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते अचानक हजेरी लावताना दिसत आहेत. एरवीही, लोकांनी टाहो फोडला, तरी त्याकडे दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी चोर पावलांनी गावागावांत येत आहेत. अमूक नेत्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आहे. त्यासाठी ताकदीने कामाला लागण्याचे आवाहन करून ते निघून जात आहेत. त्यानंतर मात्र सामान्य कार्यकर्ते त्यांची चांगलीच खेचत आहेत.

प्रश्‍नांची सरबत्ती

महागाई, दुष्काळाने लोक होरपळत आहेत. त्यांच्यासाठी काय केलं? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करीत लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. बोलावून ही येत नसणारे आता मात्र बिन बुलाए मेहमान, हे कसं काय? माढा मतदारसंघातील करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण व माण या विधानसभा मतदासंघांत असेच चित्र निदर्शनास येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com