Prashant Paricharak : उद्याचा दिवस हा पांडुरंग परिवाराचा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराची बैठक शिवसमर्थ लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होते.
Prashant Paricharak
Prashant Paricharaksakal

मंगळवेढा - पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 80 हजार मताच्या ताकदीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द म्हणून भाजपचा आमदार करून दाखवला त्यामुळे जीवात जीव असेपर्यंत कार्यकर्त्याला वाय्रावर सोडणार नाही आणि उद्याचा दिवस हा पांडुरंग परिवाराचा असल्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराची बैठक शिवसमर्थ लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील, रामकृष्ण नागणे, गौरीशंकर बुरकूल, डॉक्टर शरद शिर्के, गोपाळ भगरे, औदुंबर वाडदेकर, युन्नुश शेख, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, गौडाप्पा बिराजदार, राजेद्र पाटील, रेवणसिध्द लिगाडे, नंदकुमार हावनाळे, कांतीलाल ताटे, नामदेव जानकर, बबलू सुतार, सुरेश जोशी, माधवानंद आकळे, सचिन चौगुले, दत्तात्रय गायकवाड, श्रीकांत गणपाटील, आदीसह पांडुरंग परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार परिचारक म्हणाले की, लोकसभेची निवडणूक निवडणूक मोकळ्या मनाने करायची आहे. त्यामुळे ही निवडणूक शिंदे विरूद्ध सातपुते नसून नरेद्र मोदी विरूद्ध राहूल गांधी अशी आहे. मात्र सोलापूरची निवडणूक हि विकासा ऐवजी उमेदवार आपला की परका या मुद्द्यावरून होत आहे.

पाच वर्षात पंतप्रधान मोदी यांनी 4 कोटी बेघरांना घरकुल तर 13 कोटी महिलांना शौचालय दिले. 65 कोटी लोंकाने नळाव्दारे पाणी देण्याचे नियोजन केले. या मुद्द्यावर न बोलता राम सातपुते आपला की परका या मुद्यावर बोलले जात आहे. तालुक्यातील सहा गावाच्या पाणी प्रश्नावर जलसंपदामंत्र्याची सही रस्त्यावर उभा करून घेतली.

तेरा आमदाराच्या साखर कारखान्याला अर्थसाह्य मिळावे म्हणून ते प्रयत्नशील होते. मात्र माझ्या एका टेक्स्ट मेसेजवर दामाजी कारखान्याला शंभर कोटीचे अर्थसहाय्य उपलब्ध झाले. उमेदवार आ. राम सातपुते म्हणाले की, मी सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे या मतदारसंघातील कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला जाईल, मोदीनी जिल्ह्यात विकासासाठी काम केले.

त्यामध्ये या तालुक्यात महामार्गाचे काम झाले. उजाला योजनेतून गॅस दिले अनेक कामे विकासासाठी केले. 2014 पुर्वी दोन तीन दिवसात बॉम्बस्फोट होत होते पंतप्रधान मोदी झाल्यानंतर ते आता बंद झाले. दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की, प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेळा खासदार संसदेत पाठवण्यासाठी प्रयत्न केले.

शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या शब्द मानून या मतदारसंघात 80 हजार मते असताना प्रशांत मालक थांबले, पोटनिवडणुकीत आपल्या विचाराचा आमदार विधानसभेत पाठविला. राज्यातील सत्ता बदलून दाखवली. मालकाच्या टेक्स्ट मेसेजवर दामाजी अर्थसहाय्य उपलब्ध झाले. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख, यांनी सत्तेच्या गाभाऱ्यात असलेले कमळ जपूया असे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com