Solapur: लोणावळ्यात दरड कोसळली; सोलापूरच्या रेल्वे प्रवाशांचे हाल; सिद्धेश्वर, इंटरसिटी, वंदे भारतसह अनेक गाड्यांवर परिणाम

Landslide Disrupts Central Railway Services Near Lonavala: लोणावळा-कर्जत घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. सिद्धेश्वर, इंटरसिटी, वंदे भारतसह अनेक गाड्या रद्द, मार्ग बदल किंवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्याने सोलापूरच्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.
Solapur

Solapur

esakal

Updated on

सोलापूर: लोणावळा-कर्जत घाट विभागातील ठाकूरवाडी आणि मंकी हिलदरम्यान मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली असून, त्याचा मोठा फटका सोलापूरच्या रेल्वे प्रवाशांना बसला आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या पुणे, दौंड, सोलापूर किंवा अन्य स्थानकांपर्यंतच चालविण्यात येत आहेत. तसेच काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com