मुलीला पळविण्याचा प्रयत्न असफल ; सांगोल्यात एकावर गुन्हा

पोलिसांनी मिरज येथे रेल्वेमधून त्या अल्पवयीन मुलीची सुटका केली
lure of marriage and ten thousand attempt to kidnap girl sangola
lure of marriage and ten thousand attempt to kidnap girl sangolakidnapping
Updated on

सांगोला : गवंडीकाम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाने कामाच्या ठिकाणी जवळच असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे व दहा हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न मुलीच्या कुटुंबीय व पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. पोलिसांनी मिरज येथे रेल्वेमधून त्या अल्पवयीन मुलीची सुटका केली तर मुकेश पप्पू वर्मा (रा. भदासा, कानपूरनगर, उत्तर प्रदेश) या परप्रांतीयाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सांगोला तालुक्‍यातील एका गावामध्ये घराचे बांधकाम करण्याचे काम हा परप्रांतीय मजूर करीत होता. बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी जवळच राहणाऱ्या एका आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीशी त्याने जवळीकता साधून तसेच लग्नाचे व दहा हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून त्या अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा बेत आखला. ज्या मालकाचे बांधकाम चालू आहे, त्या मालकाची मोटारसायकल घेवून परप्रांतीय तरुणाने अल्पवयीन मुलीस पंढरपूर येथील रेल्वेस्थानकातून रेल्वे गाडीत बसून मिरज येथे रेल्वेस्थानकावर उतरण्यास सांगितले. पंढरपूरहुन परत तो मोटरसायकलवरून सांगोला येथे आला.

कारण कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने हे केले होते. परंतु मुलीच्या नातेवाईकांनी तो मोटारसायकलवरून आल्याचे दिसतात त्याच्यावर संशय व्यक्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला सुरवातीस विश्वासात घेऊन व नंतर पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने मुलीला पंढरपूर येथून मिरज रेल्वेत बसवले असल्याचे सांगितले. सांगोल्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी लगेचच मिरज रेल्वे पोलिसांना संपर्क साधून मुलीचे फोटो पाठवून मुलीचा शोध घेण्यास सांगितले. आपले काही कर्मचारीही मिरज येथे पाठवले. पोलिसांच्या तत्परतेने अल्पवयीन मुलीस मिरज रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीस लग्नाचे व १० हजाराचे आमीष दाखवुन जबरदस्तीने पळवून नेल्याने मुकेश वर्मा याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाहे.

सांगोल्यात परप्रांतियांची संख्या अधिक

सांगोल्यात डाळिंबाचा व्यापार करण्यासाठी तसेच डाळिंबाचे पॅकिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय राहतात. तसेच घराचे, इतर बांधकामे करण्यासाठी, हॉटेल्समधून मोलमजुरी करण्यासाठी अनेकजण मिळेल, त्या ठिकाणी राहण्यास आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com