माढा : माढा मतदारसंघात निवडणूक काळात दिलेली आश्वासने व मतदारसंघाच्या विकासाचे मांडलेले व्हीजन प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार कोणाचेही असले तरी निधी खेचून आणणारा असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले..माढ्यातील मिरवणुकीदरम्यान ते बोलत होते. विजयानंतर माढा, अरण, मोडनिंब, टेंभुर्णी, करकंब, देगाव, अकलूज येथे जल्लोषात आमदार पाटील यांचे स्वागत करण्यात आले. पाटील यांच्या विजयानंतर त्यांनी श्री. माढेश्वरीदेवीचे दर्शन घेतले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीतून पाटील यांच्यावर फुलांची व गुलालाची उधळण करण्यात आली. तोफा उडवून त्यांचे स्वागत करण्यात आले. .Madha Constituency Lok Sabha Election Result: शरद पवारांनी भाजपला दाखवला कात्रजचा घाट! माढ्याचा गड धैर्यशील मोहिते पाटलांनी जिंकला!.यानंतर निघालेल्या मिरवणुकीदरम्यान आ. पाटील म्हणाले, सिंचनाच्या योजना प्रलंबित असून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. शहरांच्या विकासाचे जे व्हीजन लोकांसमोर मांडले, ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार आहे. मतदारसंघात ठिकठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभा करणार. जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहील. कोणालाही कामासाठी पंढरपूरला येण्याची गरज नाही तर आठवड्यातून दोन दिवस स्वतः माढ्यात येणार आहे..माढ्यानंतर पाटील यांनी अरण येथे संत सावता माळी समाधीचे दर्शन घेतले. नंतर मोडनिंब, टेंभुर्णी, करकंब येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. देगाव येथे आईचे व ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेऊन अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील व खासदार धैर्यशील मोहिते -पाटील यांची सदिच्छा भेट घेतली..Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट .यावेळी माढ्याचे माजी उपसरपंच राजाभाऊ चवरे, नगरसेवक शहाजी साठे, गुरुराज कानडे, दिनेश जगदाळे, आबासाहेब साठे, शंभूराजे साठे, ऋषीकेश तांबिले, जितेंद्र जमदाडे, दौलत साठे यांच्यासह माढा शहर व पंढरपूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.