टेंभुर्णी/ मोडनिंब : अरण (ता. माढा) येथील कार्तिक बळीराम खंडाळे हा दहा वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण (Madha Crime News) झाल्याचा संशय पालकांकडून व्यक्त करण्यात आला होता. तब्बल पाच दिवसानंतर त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. जाधववाडी हद्दीतील सीना माढा योजनेच्या वितरिकेत त्याचा मृतदेह शनिवारी (ता. १९) सकाळी आढळून आला.